Home शहरं नागपूर Nagpur News : चंद्रपुरात आजपासून स्वॅब तपासणी प्रयोगशाळा - swab testing laboratory...

Nagpur News : चंद्रपुरात आजपासून स्वॅब तपासणी प्रयोगशाळा – swab testing laboratory at chandrapur from today


म.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

करोना विषाणूबाबतच्या चाचण्यांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असणारी स्वॅब तपासणी प्रयोगशाळा चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

करोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील द्रव नमुन्यांची चाचणी केल्या जाते. सध्या येथील नमुने तपासणीसाठी नागपूर येथील तीन ठिकाणी पाठविण्यात येत आहेत. तथापि, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायित्व निधीतून २ कोटी १८ लक्ष खर्चाची तरतूद करीत या कामाला १४ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सध्या त्याचे लघु स्वरूप असून येथे निवडकच नमुने तपासले जात आहे. आता नवीन मशीन्स दाखल झाल्या असून नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने त्यासाठी परवानगी दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या प्रयोगशाळेत आता दररोज १५० नमुने तपासले जातील, अशी माहिती डॉ. मोरे यांनी ‘मटा’ला दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘लोकहितवादी’चा सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा...

Bihar election: संयमाची लस टोचा – editorial on bihar election 2020 and bjp promises free covid vaccine to people

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वांना करोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन, सगळी नैतिकता खुंटीला...

Recent Comments