Home शहरं नागपूर Nagpur News : ताडोबा बफर क्षेत्रातील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार - cowboys...

Nagpur News : ताडोबा बफर क्षेत्रातील वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार – cowboys killed in tiger attack


म.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफरमध्ये असणाऱ्या मुल वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. रमेश भीमराव वेलादी (वय ६०) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, ताडोबा बफरमधील ही व्याघ्रहल्ल्याची चालू वर्षातील सातवी घटना ठरली आहे.

ताडोबा बफरमध्ये असणाऱ्या मुल वनपरीक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७६७मध्ये काटवन येथील गुराखी रमेश वेलादी हा गुरुवारी चार जणांसोबत जनावरांना घेऊन गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाच्यावतीने सदर परिसरात ६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मृत रमेश वेलादी यांच्या कुटुबाला वनविभागाच्या मदतीने ३० हजारांची तातडीची आर्थिक मदत करण्यात आली. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर क्षेत्रातील कोलारा परिसरालगत पाच बळी घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या केटी-१ वाघाला १० जून रोजी बेशुद्ध करून पकडण्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाला यश आले होते. दरम्यान, ताडोबा बफरमधील ही व्याघ्र हल्ल्याची चालू वर्षातील सातवी घटना ठरली आहे, तर चालू वर्षातील वन्यजीव हल्ल्यांची ही जिल्ह्यातील सोळावी घटना आहे. यात १५ हल्ले वाघाने, तर एक हल्ला बिबट्याने केला आहे. मागील वर्षभरात वन्यजीव हल्ल्यात जिल्ह्यात २३ बळी गेले आहेत. त्यातील सर्व हल्ले हे वाघाने केले असून दोन हल्ले बिबट्याने तर एक हत्तीने केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

Recent Comments