Home शहरं नागपूर Nagpur News: ‘ते’ होते गोदामात लपून - 'they' were hiding in the...

Nagpur News: ‘ते’ होते गोदामात लपून – ‘they’ were hiding in the warehouse


सतरंजीपुऱ्यातील १२ जणांची आमदार निवासात रवानगीमटा…

Updated:

MT

सतरंजीपुऱ्यातील १२ जणांची आमदार निवासात रवानगी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या भीतीने सतरंजीपुऱ्यातील १२ जण कळमन्यातील गोदामात दोन दिवसांपासून लपून होते. कळमना पोलिसांनी छापा टाकून १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांची सिव्हिल लाइन्समधील आमदार निवासातील विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली.

सतरंजीपुऱ्यातील करोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या भागातील नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवायला सुरुवात केली आहे. आपल्यालाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात येण्याच्या भीतीने एकाच कुटुंबातील दहा जण तर, २२ वर्षीय युवक व १६ वर्षीय मुलगा २३ एप्रिलला सतरंजीपुऱ्यातून पसार झाला. सर्वजण कळमन्यातील विजयनगरमधील नदीम अन्सारी याच्या गोदामात लपले.

दरम्यान, पोलिसांचा पहारा असताना सतरंजीपुऱ्यातील अख्खे कुटुंब बेपत्ता झाल्याने पोलिस व महापालिका प्रशासनात खळबळ उडाली. पोलिसांनी यादीतील या बेपत्ता १२ जणांचा शोध घ्यायला सुरुवात केला. सतरंजीपुऱ्यातील १२ जण गोदामात लपवून बसल्याची माहिती कळमना पोलिसांना माहिती मिळाली. पोलिस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास गोदामात छापा टाकला. पोलिसांनी १२ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर महापालिका प्रशासन व पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांची आमदार निवासात रवानगी केली.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : उपसभापती सुनील पाटील अपात्र – deputy speaker sunil patil ineligible

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगावपंचायत समिती सभापती निवडीप्रसंगी बंड करीत राष्ट्रवादी काँग्रेसला जावून मिळालेले भाजपचे करगाव गणाचे पंचायत समिती सदस्य तथा उपसभापती सुनील साहेबराव...

ajit pawar: Ajit Pawar: ‘मुंबई पोलिसांच्या ‘या’ पराक्रमाला जगाच्या इतिहासात तोड नाही’ – mumbai terror attacks ajit pawar paid homage to the martyrs

मुंबई: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी नागरिकांचं रक्षण करताना शहीद झालेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, एनएसजी कमांडो व गृहरक्षक दलातील जवानांचे शौर्य व त्यागाचे स्मरण...

Recent Comments