Home शहरं नागपूर Nagpur News : ‘थ्री लेयर मास्क’ देतील सर्वांना संरक्षण - 'three layer...

Nagpur News : ‘थ्री लेयर मास्क’ देतील सर्वांना संरक्षण – ‘three layer masks’ will protect everyone


म.टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनाकाळात सगळ्यांसाठी आवश्यक झालेले चेहऱ्याचे मास्क कमी वस्तूत आणि घरच्या घरी बनविण्याची संकल्पना नागपूरकर तरुणांनी शोधली आहे. या तरुणांच्या डिझाइननुसार ‘थ्री लेयर मास्क’ वापरल्यास नागरिकांचे करोनाच्या विषाणूपासून बऱ्याच प्रमाणात संरक्षण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परितोष चौधरी, पार्थ धोंड आणि स्वप्नील भुरे यांनी हे मास्क तयार केले आहेत. यापैकी परितोष आणि पार्थ हे नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाइनचे विद्यार्थी आहेत. स्वप्नील हा इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सचा विद्यार्थी आहे.

शीतपेयाची मोठी बाटली, तांब्याची तार, टोपी, इलॅस्टिक, जाड पिशवीचे कापड यांचा उपयोग करून त्यांनी हा मास्क तयार केला आहे. कुणालाही घरच्या घरी हा मास्क तयार करता येइ्रल. तो वारंवार वापरतादेखील येणार आहे, असे पार्थ धोंड यांनी सांगितले. सध्या वापरात असलेले शिवलेले कापडी मास्क किंवा रुमालाने पूर्ण संरक्षण मिळत नाही. करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेले एन-९५ मास्क सगळे लोक वापरू शकत नाहीत. ग्रामीण भागात अद्यापही अनेक ठिकाणी हे मास्क उपलब्ध नाहीत. महागडे मास्क घेण्यासाठी अनेकांना खिसा परवानगी देत नाही. अशांसाठी घरगुती ‘थ्री लेयर मास्क’ उपयोगात पडतील, असे या तरुणांचे म्हणणे आहे. एखादी व्यक्ती शिंकल्यानंतर काही काळ त्यातील घटक वातावरणात राहतात. सार्वजनिक ठिकाणी वातावरणातील हे घटक दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यापासून बचाव करण्यासाठी ‘थ्री लेयर मास्क’ उपयोगाचे ठरतील असेही तरुणांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

world Test championship: IND vs ENG : विजयानंतरही भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत बसू शकतो धक्का, पाहा समीकरण… – ind vs eng : if team...

अहमदाबाद, IND vs ENG : भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने या मालिकेत २-१ अशी...

PM Modi: pm modi : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर PM मोदी म्हणाले, ‘दलालांमुळे शेतकऱ्याची…’ – pm modi address bjp rally in coimbatore our govt that had...

कोईम्बतूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ) यांची कोईम्बतूरमध्ये प्रचारसभा झाली. सरकार सर्व वर्गाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. मी नुकताच एका कार्यक्रमातून...

Recent Comments