Home शहरं नागपूर Nagpur News : देशात नागपूर विद्यापीठ १९६व्या स्थानी - nagpur university is...

Nagpur News : देशात नागपूर विद्यापीठ १९६व्या स्थानी – nagpur university is ranked 196th in the country


रँकिंगमध्ये घसरले; प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा फटका

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

मध्य भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला राष्ट्रीय रँकिंगमध्ये पुन्हा एकदा तळाचा क्रमांक मिळाला आहे. शतकोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या नागपूर विद्यापीठाला पहिल्या १०० विद्यांमध्येही स्थान प्राप्त करता आलेले नाही. त्यामुळे सक्षम नेतृत्व आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही शैक्षणिक पातळीवर विद्यापीठाला पुन्हा एकदा तोंडघशी पडावे लागले आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांचे रँकिंग घोषित केले. त्यात महाराष्ट्रातील फारच मोजक्या विद्यापीठ व शासकीय शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. राज्यातील तब्बल सहा खासगी शैक्षणिक संस्था व खासगी अभिमत विद्यापीठांना पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळाले आहे. परंतु, राज्यातील पारंपरिक विद्यापीठे या रँकिंगमध्ये माघारले असल्याचे दिसून येते. नागपूर विद्यापीठाला मागील शैक्षणिक रँकिंगमध्ये १४७वा क्रमांक मिळाला होता. त्यामुळे पहिल्या किमान १५० विद्यापीठांमध्ये नागपूर विद्यापीठाचा समावेश असल्याचे समाधान मिळाले होते. परंतु, यंदा घोषित केलेल्या क्रमवारीत नागपूर विद्यापीठाला १५० ते २०० या क्रमवारीत १९६व्या क्रमाकांवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असल्याचे त्यातून स्पष्ट होते.

रिक्त जागांचा फटका

नागपूर विद्यापीठातील ४० पदव्यत्तर विभागांमध्ये नियमित प्राध्यापक नसल्याचा जबर फटका शैक्षणिक गुणवत्तेवर पडतो आहे, असे माजी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे म्हणाले. नागपूर विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा हा देशातील इतर कोणत्याही विद्यापीठांसमान अथवा त्यापेक्षाही सरस आहे. परंतु, आता बहुतांश विभागांमध्ये एक अथवा दोनच प्राध्यापक आहेत. त्यामुळे संशोधन, पेटेंट, कन्सल्टन्सी प्रकल्प अथवा शैक्षणिक कामांसाठी प्राध्यापकच उपलब्ध नाहीत. आता तर नवीन भरती होणार नाही. त्यामुळे भविष्यात विद्यापीठाची परिस्थिती अधिक दयनीय होणार आहे.

औरंगाबाद नागपूरपेक्षा सरस

नागपूर विद्यापीठातील प्र कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा औरंगाबाद विद्यापीठावर गेल्यावर्षी कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. त्यापूर्वी औरंगाबाद विद्यापीठाचा देशात ८६ वा क्रमांक होता. परंतु, डॉ. येवले यांनी वर्षभरात केलेल्या कामांमुळे औरंगाबाद विद्यापीठाने देशात ६३ वा क्रमांक प्राप्त केला आहे. अवघ्या वर्षभरात २० क्रमांकाने या विद्यापीठाचे रँकिंग वाढले आहे. यासंदर्भात ‘मटा’शी बोलताना डॉ. प्रमोद येवले म्हणाले, ‘मराठवाडा विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाल्याचा मला आनंद आहे. तरीही आम्ही संशोधनात मागे पडलो. त्यामुळे आगामी वर्षभरात काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार असून, देशात पहिल्या ५० मध्ये मराठवाडा विद्यापीठाचा क्रमांक येईल, असा प्रयत्न करू’

सोलापूर, अमरावती कुठेही नाही

राज्यातील सोलापूर विद्यापीठात नागपुरातील महिला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी फडणवीस या कुलगुरूपदावर नियुक्त झाल्या आहेत. तर, अमरावती विद्यापीठात कुलगुरू पदाची चार वर्षे पूर्ण करणारे डॉ. मुरलीधर चांदेकरदेखील नागपुरातीलच आहेत. या दोन्ही विद्यापीठांमध्ये अनेक नवीन उपक्रम सुरू करण्यात आले असले तरीही राष्ट्रीय रँकिंगमध्ये या दोन्ही विद्यापीठांना पहिल्या २००मध्ये स्थान पटकावता आलेले नाही. तर दुर्गम व माओवादी क्षेत्रातील गोंडवाना विद्यापीठालादेखील कोठेही स्थान मिळवता आलेले नाही. या विद्यापीठाला तर अद्याप विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळालेली नाही.

व्हीएनआयटी व रामदेवबाबा चमकले

नागपुरातील राष्ट्रीय विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला (व्हीएनआयटी) देशातील सर्वोत्तम इंजिनीअरिंग कॉलेजेसमध्ये देशात २७वा क्रमांक मिळाला आहे. तर राज्यात आयआयटी मुंबई पहिल्या क्रमांकवर, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई दुसऱ्या आणि व्हीएनआयटी नागपूर तिसऱ्या स्थानावर आहे. रामदेवबाबा अभियांत्रिकी कॉलेजला महाराष्ट्रात खासगी कॉलेजेसमध्ये पहिल्या क्रमांकाचे इंजिनीअरिंग कॉलेज म्हणून रँकिंग मिळाले आहे. तर सर्वसाधारण यादीत रामदेवबाबा कॉलेज देशात या कॉलेजचा ११३ वा क्रमांक तर राज्यात नवव्या स्थानावर आले आहे. तर वायसीसीई इंजिनीअरिंगमध्ये १३९, जी.एच. रायसोनीदेखील १३९व्या स्थानी आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाला सुरुवात | National

पाऊस BREAKING : पिंपरी चिंचवड- शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात  पुण्यातही दमदार पावसाची हजेरी पुढील 3 ते 4 तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा...

assam rifles: अरुणाचल प्रदेशात आसाम रायफल्सच्या टीमवर हल्ला, जवान शहीद – assam rifles team ambushed jawan killed in arunachal pradesh

इटानगर : अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) आसाम रायफल्सच्या (Assam Rifles) पॅट्रोल टीमवर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय....

Dinner Date: डिनर डेटवर २३ जणांसह युवती पोहचली; बिल पाहून युवकाने काढला पळ! – girl brings 23 relatives to her blind date to test...

बीजिंग: आपला होणारा नवरा किती उदार आहे, हे जाणून घेण्यासाठी ब्लाइंड डिनरवर आलेली युवतीन २३ मित्र, नातेवाईकांसोबत येऊन धडकली. सुरुवातीला सर्व काही ठिक...

aurangabad News : अनुकंपा तत्त्वावर मिळाली पालिकेत ३९ जणांना नोकरी – 39 people got jobs in the municipality on compassionate basis

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'लॉकडाऊन'च्या काळात महापालिकेच्या आस्थापना विभागाने ३९ जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली आहे. त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अनुशेष भरून निघाल्याचे मानले...

Recent Comments