Home शहरं नागपूर Nagpur News : दोन खुनांचा थरार - the thrill of two murders

Nagpur News : दोन खुनांचा थरार – the thrill of two murders


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनाच्या धोक्याशी नागपूरकर सामना करीत असतानाच रविवारी लकडगंज आणि पाचपावली येथे घडलेल्या खुनांच्या दोन घटनांनी उपराजधानी हादरली. लालचंद देविदास मेंढे तसेच विठ्ठल सिध्दार्थ बागडे असे हत्या झालेल्यांची नावे आहेत.

‘भिकारी म्हटल्याने संतप्त झालेल्या चौकीदाराने दोन मजुरांच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही थरारक घटना रविवारी पहाटे लकडगंजमधील टेलिफोन एक्सचेंज चौकातील मेहता पेट्रोल पंपाजवळ घडली. लकडगंज पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मारेकऱ्याला अटक केली आहे. कालू ऊर्फ लालचंद देविदास मेंढे (वय ४०),असे मृताचे, तर कंडक्टर असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विनोद सीताराम मोखे (वय ४० ,रा.लालगंज), असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कालू व कंडक्टर हे दोघे मेहता पेट्रोल पंपामागील फुटपाथवर राहतात. कालू व कंडक्टर हे मजुरी करायचे. याच परिसरातील एका गोदामात विनोद हा चौकीदार आहे. विनोद हा कालू व कंडक्टरसोबत राहायचा. शनिवारी एका सामाजिक संस्थेद्वारे फुटपाथवरील लोकांना पुरी-भाजीचे वितरण करण्यात आले. कालू व कंडक्टरनेही पुरी भाजी घेतली. दोघेही जेवायला लागले. याच वेळी विनोद तिथे आला. दोघांनी विनोदला भिकारी म्हटले. त्यामुळे विनोद संतापला. पहाटे ३ वाजताच्या सुमारास विनोदने हातोड्याने कालू व कंडक्टरच्या डोक्यावर वार केले. कालूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर कंडक्टर जखमी झाला. यानंतर विनोदने लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी विनोदला अटक केली. जखमी कंडक्टरला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

…तर घटना टळली असती

शनिवारी दुपारी विनोदने कालू व कंडक्टरसोबत वाद घालून त्यांना मारहाण केली. हे प्रकरण लकडगंज पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली. पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली असती तर ही घटना टळली असतील, अशी चर्चा परिसरात आहे.

युवकाची हत्या

नागपूर : पैसे हिसकावल्याने युवकाची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना पाचपावलीतील टेका भागातील सिद्धार्थनगर येथे रविवारी सायंकाळी घडली. विक्की ऊर्फ विठ्ठल सिध्दार्थ बागड़े (वय २०),असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी मारेकरी प्रभाकर मेश्रामला अटक केली.

रविवारी दुपारी विक्की याने प्रभाकर याला पैसे मागितले. प्रभाकर याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे विक्की याने बळजबरीने प्रभाकर याच्या खिश्यातून ५०० रुपये काढले. त्यामुळे प्रभाकर संतापला. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास विक्की हा सिद्धार्थनगरमधील वाचनालयाजवळ उभा होता. यावेळी प्रभाकरही तेथे आला. विक्की याने प्रभाकरला शिवीगाळ केली. प्रभाकरने विक्की याच्यावर चाकूने सपासप वार केले व पसार झाला. पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे व त्यांचे सहकारी घटनस्थळावर पोहोचले. पोलिसांनी प्रभाकरला अटक केली.

………Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Recent Comments