Home शहरं नागपूर Nagpur News : धक्कादायक! व्याघ्र तस्करी वाढली; तीन देशांतून वाघ लुप्त! -...

Nagpur News : धक्कादायक! व्याघ्र तस्करी वाढली; तीन देशांतून वाघ लुप्त! – tigers still roam wild in these 13 tiger-range countries


पंकज मोहरीर, चंद्रपूर

जागतिक पातळीवर सर्वत्र मोजक्याच देशात वाघ उरले आहेत. त्यातल्या त्यात भारताकडून जगाला मोठी आशा आहे. जगातील ७५ टक्के वाघ असणाऱ्या भारतात व्याघ्र संवर्धनाचे मोठे काम सुरू आहे. परंतु शिकारीचे मोठे संकट आजही कायम आहे. व्याघ्र तस्करीचे मुख्य केंद्र मानल्या जाणाऱ्या चीननजीक असणाऱ्या तीन देशांतून मागील १० वर्षांत वाघ जवळपास लुप्त झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिणामी व्याघ्र संवर्धनाच्या बाबतीत आता भारताची जबाबदारी वाढली आहे.

मार्जार कुळातील ३७ जातींतील सर्वांत मोठा आणि सामर्थ्यशाली प्राणी म्हणून वाघाची ओळख आहे. वाघ हा ऱ्या अर्थाने जंगलाचा राजा आहे. अन्न साखळीतील सर्वांत टोकाचे स्थान वाघाला आहे. प्राचीन काळापासून भारतात वाघ नैसर्गिक संपत्तीत वनांचा राजा म्हणून सुखाने राहात होता. इंग्रजांच्या आगमनानंतर भारतात वाघांच्या शिकारीला सुरुवात झाली. नंतर जंगलतोड सुरू झाली. त्यामुळेही वाघांची संख्या कमी झाली.

जागतिक पातळीवर १३ देशांतच वाघ उरले होते. आता त्यातील व्हियतनाम, लाओ पी. डी. आर. व कंबोडिया या तीन देशांचे नाव कमी झाले आहे. चीनमध्ये व्याघ्र तस्करी वाढल्याने हा प्रकार होत आहे. वाघांची शिकार हेच या तीन देशांतील वाघ लुप्त होण्याचे मुख्य कारण आहे, असे भारतीय वन्यजीव संस्थांनचे संशोधक यादवेंद्र देव झाला यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. आता या तीन देशातील वाघांना अधिवास नष्ट झाला आहे. भारतासह रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ, थायलंड, बांगलादेश, भूतान, म्यानमार, चीन येथे आता वाघ उरले आहेत. जगातून व्याघ्र प्रजाती झपाट्याने लुप्त होत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. अशात भारतात वाघांना वाचविण्यासाठी मोठे प्रयत्न होत आहे. २०१८मध्ये देशात झालेल्या व्याघ्र गणनेनुसार २ हजार ९६७ वाघांची नोंद भारतात झाली. संकटात असलेल्या भारतीय वाघांची संख्या वाढत आहे.

१६८ वाघ बळी

गेल्या आठ वर्षांत देशाने ७५० वाघांना गमाविले आहे. त्यापैकी पहिल्या तीनमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकचा क्रमांक लागतो. त्यातील एकूण मृत्युपैकी १६८ वाघ हे शिकाऱ्यांचे बळी ठरले आहेत. शिकारीच्या टक्केवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

navi mumbai corona update: चिंचपाडावासींचे करोनाशी दोन हात – coronavirus cases rate declined in the chinchpadavasi slum navi mumbai

माधवी यादव-पाटील, नवी मुंबईकरोनासमोर भल्याभल्यांनी हात टेकले. असे असताना पुरेशा सोयीसुविधा नसतानाही नियमांचे काटेकोर पालन करत ऐरोलीतील चिंचपाडा झोपडपट्टीवासींनी इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर...

sensex today: शेअर बाजार ; नफावसुली जोरात, सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला – Sensex Down By 400 Points As Sell Off Across The Conters

मुंबई : महिनाअखेरच्या शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घोदौडीला ब्रेक लावला. आज शुक्रवारी सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला आहे. निफ्टीमध्ये...

nashik municipal corporation: पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड – nashik municipal corporation has announced bonus to employees

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी, आयुक्त कैलास जाधव यांनी सानुग्रह अनुदानाबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदाही 'गुड...

Recent Comments