Home शहरं नागपूर Nagpur News : नागपुरातून गेल्या ७२० श्रमिक ट्रेन - last 720 labor...

Nagpur News : नागपुरातून गेल्या ७२० श्रमिक ट्रेन – last 720 labor trains from nagpur


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

करोनामुळे घोषित केलेल्या लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने देशभरात पाठवलेल्या विशेष श्रमिक ट्रेनपैकी सुमारे ७२० ट्रेन नागपूरातील रेल्वे स्थानकातून गेल्या आहेत. त्यापैकी सुमारे ३५० ट्रेनमधील चार लाखांहून अधिक श्रमिक नागपूर रेल्वे स्थानकावर थांबले होते, त्यांना भोजन, पाणी व इतर सोयी नागपूर विभागीय रेल्वेकडून देण्यात आल्या होत्या, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.

स्थलांतरित श्रमिकांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणारे वृत्त ‘मटा’ने प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेत नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल केली होती. नागपूर शहर देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दक्षिण भारतातील श्रमिक, उत्तर, उत्तर पूर्व, पश्चिम, आणि पूर्वेकडील राज्यांत मोठ्या संख्येने स्थलांतरित होत होते. त्यावेळी श्रमिकांना प्रवासाचे कोणतेही साधन नसल्याने ते पायीच हजारो किलोमीटरचा प्रवास करीत होते. त्यांच्या या दयनीय अवस्थेची दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकार, रेल्वे मंत्रालय यांना श्रमिकांच्या सुरक्षित प्रवासाकरिता साधने उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता.

हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आणि रेल्वे मंत्रालयाकडून विशेष श्रमिक ट्रेनची सोय करण्यात आली. त्याबाबत रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून सुमारे २२ विशेष श्रमिक ट्रेन विविध राज्यात पाठवण्यात आल्या होत्या. अखेरची श्रमिक ट्रेन १३ जून रोजी पाठवण्यात आली होती, तर त्या २२ विशेष श्रमिक ट्रेनमधून सुमारे २० हजार ८४० श्रमिकांना विविध राज्यात पाठवण्यात आले होते. या श्रमिक ट्रेनची मागणी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेल्वे मंत्रालयाला केली होती.

दरम्यान, नागपूर रेल्वे स्थानकातून ७२० ट्रेन विविध राज्यात गेल्या. त्यापैकी ३५० ट्रेन नागपुरात थांबा देण्यात आला होता. त्यातील ४ लाख ९४ हजार ९९ श्रमिकांच्या भोजन, पाणी व आरोग्य सेवांची मदत नागपूर रेल्वे स्थानकाने केली होती. तर १९४ ट्रेन बल्लारशा स्थानकावर थांबा देण्यात आला, त्यातील दोन लाख ७२ हजार श्रमिकांना बल्लारशा रेल्वे स्थानकाने सामाजिक संस्थांच्या मदतीने अन्न, पाणी व इतर सोयी दिल्या होत्या, असे शपथपत्रात नमूद केले आहे. रेल्वेच्या वतीने अॅड. नितीन लांबट यांनी बाजू मांडली,.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

fyjc online admissions 2020: अकरावी प्रवेश लांबणीवर? विद्यार्थ्यांची आणखी चार आठवडे रखडपट्टी – fyjc online admissions 2020 uncertainty over fyjc online admissions continue due...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सर्वोच्च न्यायालयाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण प्रवेशात मराठा आरक्षण लागू करू नये, असे निर्देश देऊन मराठा आरक्षण...

Samsung Galaxy S21 series: सॅमसंगच्या या फोन्ससोबत मिळणार नाहीत चार्जर आणि इयरफोन – samsung galaxy s21 series may ship without in-box charger, headphones: report

नवी दिल्लीः अॅपलने नुकतीच आयफोन १२ सीरीज सोबत चार्जर आणि इयरपॉड्स न देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या या निर्णयाची अनेक ब्रँड्सने खिल्ली उडवत...

Recent Comments