Home शहरं नागपूर Nagpur News : नासुप्रतील ३० कंत्राटी कामगारांना काढले - removed 30 contract...

Nagpur News : नासुप्रतील ३० कंत्राटी कामगारांना काढले – removed 30 contract workers from nasupra


युवा सेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नागपूर सुधार प्रन्यास येथे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता काढण्यात आल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. नोकरी गेली असल्याने या कामगारांचे संसार उघड्यावर पडले असल्याची व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी मांडली.

नागपूर सुधार प्रन्यासअंतर्गत परभणी येतील महात्मा फुले मल्टिसर्व्हिसेस या संस्थेत गेल्या दहा ते वीस वर्षांपासून ३० कर्मचारी कार्यरत होते. नासुप्रच्या कळमना येथील हॉटमिक्स प्लान्ट येथे वाहनचालक व कुली म्हणून हे कामगार काम करीत होते. करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात एक दिवसाआड कामावर बोलावण्यात आले. मात्र, लॉकडाउन वाढल्यानंतर या कामगारांना कायमची सुटी देण्यात आली. ९ एप्रिल रोजी सकाळी कामावरून काढल्याचा मेसेज या कर्मचाऱ्यांना प्राप्त झाला. नासुप्रने कळविल्यानुसार आपली सेवा १ एप्रिलपासून खंडित करण्यात आली असल्याचे या संदेशात नमूद होते. कुठलीही पूर्वसूचना न देता आम्हाला नोकरीवरून का काढले, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राठोड यांनी दिला. मुख्यमंत्र्यांसह कामगार आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली असल्याचे राठोड यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad district planning committee: शासनाचा आर्थिक गाडा रुळावर – remaining funds have been provided to district planning committee by government

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्हा नियोजन समितीचे कामकाज इंटिग्रेटेड, प्लानिंग ऑफिस ऑपरेशन सिस्टीमद्वारे (आयपीएएस) करावयाचे होते, मात्र मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यांनी या...

Akshar Patel Not Played Single Test Match For India But Get Chance In Team Against England – IND vs ENG : एकही कसोटी सामना...

नवी दिल्ली, IND vs ENG : ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय संघ इंग्लंडच्या संघाशी दोन हात करणार आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची...

सुशांतसिंह राजपूत बर्थडे: सुशांतसिंह राजपूतच्या बर्थडेला बहिणीने लिहीलं भावुक पत्र, शेअर केले Unseen Photos – sushant singh rajput sister shweta singh kirti posts photos...

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील चाहते सोशल मीडियावर आपल्या भावना शेअर करत आहेत. कालपासूनच ट्विटरवर त्याचा नावाचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहेत. सुशांतच्या...

Recent Comments