शेतात पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने रमेशने त्याच्या पत्नीच्या गळ्यातील पोत कानातले सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यातून फक्त शेतीसाठी बियाणे व खत घेण्यात आले. शेतीत लागवड करण्यासाठी बैलजोडीची गरज असते, मात्र त्याचं भाड देणे होत नसल्याने शेतकरी रमेशने स्वतः काकरी बनवली आणि दिवसभर बैलासारखी ओढून कपाशी लागवडीसाठी शेतात काकर फाडले. त्यानंतर पत्नी ,पुतणे शेतीच्या कपाशी लागवड करण्यासाठी मदत करू लागले. यातून पैसा खर्च होत नाही मात्र बियाणे व खत यावर पैसे खर्च केला आहे.
अचानक माझ्या मुलाला ब्लड कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. तेवढे पैसे त्याच्या आजाराला लावावे लागले. अनेकांनी आर्थिक मदत केली मात्र अक्षयने अखेर जगाचा निरोप घेतला. त्याच्या आजारासाठी अनेकाकडून कर्ज घेतले,आता खरीप हंगामाला सुरुवात झाली शेती पेरणी करायची कशी हा प्रश्न सतावत असताना पत्नीच्या गळ्यातील पोत ,कानातले गहाण ठेवले आता त्यातून मिळालेल्या पैशात शेती करत आहे.