Home शहरं नागपूर Nagpur News : ‘पसारा’विना धावताहेत कॅश व्हॅन - cash vans are running...

Nagpur News : ‘पसारा’विना धावताहेत कॅश व्हॅन – cash vans are running without passing


कोट्यवधीची ने-आण परवान्याशिवाय

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

बँक, एटीएममध्ये पैसे जमा करणाऱ्या कॅश व्हॅन सुरक्षित नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. कोट्यवधीची ने-आण करणाऱ्या या व्हॅनसाठी आवश्यक प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सी अॅक्ट (पसारा) परवाना शहरातील सुरक्षा एजन्सीने प्राप्त केल्याची कुठलीही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वोच्च बँकेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे आता कॅश व्हॅनच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आरबीआयच्या परिपत्रकानुसार, सुरक्षा एजन्सीला पोलिस आयुक्तालय वा परवाना विभागातून पसारा परवाना प्राप्त करणे अनिवार्य आहे. परवाना संपूर्ण राज्यापुरता, पाच जिल्ह्यांसाठी किंवा केवळ एका जिल्ह्यासाठी देण्यात येतो. त्यानुसार, बँकांच्या कॅश व्हॅनलासुद्धा हा परवाना काढणे आणि मुदत संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण आवश्यक आहे. परवान्याशिवाय सुरक्षा एजन्सी काम करू शकत नाही. या पार्श्वभूमीवर आरटीआय कार्यकर्ते सचिन खोब्रागडे यांनी आरबीआयला मागील दहा वर्षांत पसारा परवाना प्राप्त केलेल्या बँकांची माहिती मागितली. त्यावर मिळालेल्या उत्तरानुसार, आरबीआयकडे हा परवाना प्राप्त असलेल्या एकाही सुरक्षा एजन्सीची माहिती नाही. सुरक्षा एजन्सी ज्या बँकेसाठी काम करत आहे. तर हा परवाना प्राप्त केल्याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. परंतु, आरबीआयच्या उत्तरामुळे आता कॅश व्हॅन सुरक्षित नसल्याची नवीनच समस्या पुढे आली आहे. कॅश व्हॅनच सुरक्षित नसेल तर त्यातून दळणवळण होत असलेला नागरिकांचा पैसादेखील असुरक्षित असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.

सुरक्षारक्षकांना तोकडे वेतन

बरेचदा बँक आणि सुरक्षा एजन्सी या प्रकारचा परवाना प्राप्त करण्यासाठी आग्रही नसतात. बँक एजन्सीला काम आउटसोर्स करते. एजन्सी परवाना न घेता काम करते. सुरक्षारक्षकांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे लागू नये, यासाठी हा परवाना घेण्यात येत नसल्याची माहिती आहे. एकीकडे नागरिकांच्या पैशांची सुरक्षा धोक्यात येत असताना दुसरीकडे एजन्सीसाठी काम करणाऱ्यांवरदेखील अन्याय होत असल्याचे चित्र आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik onion growers: कुठे घसरला, तर कुठे वधारला – onion price decline in pimpalgaon, lasalgaon and onlion price increased in manmad and nandgaon

टीम मटागेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कांदादराबाबत चढउतार अनुभवास येत आहेत. सोमवारी पिंपळगाव, लासलगावात कांदादरात ३०० रुपयांची घसरण झाली तर, येवला मनमाड, नांदगावात मात्र...

शेकडो संस्था सभासदत्वाविना

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या पंचवीस वर्षांपासून आलटून पालटून काही अंशी बिनविरोध करून तेच तेच संचालक आजपर्यंत कायम असून,...

india add 40 new billionaires in pandemic: billionaires in india अब्जाधीश वाढले ; ‘लॉकडाउन’मध्ये सामान्यांची परवड तर धनदांडग्यांची बक्कळ कमाई – india add 40...

हायलाइट्स:हुरुन ग्लोबल रिच लिस्टमध्ये देशभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीचा आढावागेल्या वर्षभरात ४० नवे अब्जाधीश बनलेभारतात एकूण १७७ अब्जाधीश मुंबई : करोनाने सर्वसामान्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम...

Recent Comments