Home शहरं नागपूर Nagpur News : पाच महिलांनी टाकला हावरापेठमध्ये दरोडा - five women commit...

Nagpur News : पाच महिलांनी टाकला हावरापेठमध्ये दरोडा – five women commit robbery in howrah


रोख रकमेसह अडीच लाखांचे दागिने लुटले

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

हावरापेठेतील महादेव लक्ष्मी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये पाच महिलांनी दरोडा टाकून रोख रकमेसह अडीच लाखांचे दागिने लुटले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

याप्रकरणी अजनी पोलिसांनी अनुपमा खांडेकर (रा. जयभीनगर, इंदोरा) व तिच्या चार महिला साथीदारांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रिया दिलीपकुमार नंदागावळी (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुपमा ही उच्चशिक्षित आहे. तिचा पती अभियंता आहे. कौटुंबिक कलहातून दोन वर्षांपूर्वी अनुपमा ही मुलासह माहेरी राहायला गेली. अनुपमाच्या पतीला प्रिया या ओळखतात. दोघांचे बोलणे व्हायचे. याबाबत अनुपमा यांना कळले. त्या संतापल्या. शुक्रवारी दुपारी अनुपमा व अन्य चार महिला प्रिया यांच्या घरात घुसल्या. शिवीगाळ करून प्रिया व त्यांच्या आईला मारहाण केली. आलमारीतील ५० हजार रुपयांची रोख, सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचे साहित्य लुटले. प्रिया यांनी अजनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. घटनेचे नेमके कारण शोधण्यात येत आहे, असे अजनी पोलिसांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

President Ramnath Kovind: president speech on republic day : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन… – president ramnath kovind speech on republic day live...

नवी दिल्लीः देश उद्या आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. करोना संकटाच्या स्थितीत आणि चीन, पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती देशाला...

Recent Comments