Home महाराष्ट्र Nagpur News : फक्त भाजीचे पैसे, पोळ्या हव्या तेवढ्या मोफत - only...

Nagpur News : फक्त भाजीचे पैसे, पोळ्या हव्या तेवढ्या मोफत – only vegetable money, as much honey as you want for free


म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नागपूरची ओळख राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संत्रानगरी आहे. पण, येथील खाद्यसंस्कृती, आदरातिथ्यात होणारा पाहुणचार पाहता या शहराला तेलपूर, मसालेपूर, झणझणीतनगरी असेदेखील म्हणायला हवा. मसाले, तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर ही इथल्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या कुळातील आद्य बल्लवाचार्य कुणी असतील तर ते सावजी म्हणायला हवेत. या व्यवसायात उरलेल्या अस्सल सावजी खाणावळ चालविणाऱ्यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, ते फक्त भाजीचे पैसे घेतात. भाजीसोबत मिळणाऱ्या पोळ्या मोफत असतात.

सावजी मंडळीने नागपुरातील खाद्यपरंपरा आजही टिकवून ठेवली आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रचार-प्रसारामुळे आता सावजी खाण्यासाठी शहरातील विशिष्ट परिसरात बाहेराहून खवय्ये येऊ लागले आहेत. राज्याच्या उपराजधानीतील खाद्योतिहास हा तसा झणझणीत आहे. त्यामुळे भाजी कुठलीही असो… कांदा, लसूण, तिखट आणि भाजीच्यावर अक्षरश: तरंगणारे तेल यांचा वापर झाल्याशिवाय राहात नाही. काही पदार्थ बनविताना वरून लसणाची फोडणी देण्याची पद्धतही आहे. हिरवी वांगी, घोळीची भाजी याला विदर्भाची स्वत:ची वेगळी चव आहे. सावजी पदार्थांनीही आपली स्वतंत्र अशी ओळख महाराष्ट्राला करून दिली आहे. बेळगावात जसे पुरोहित, राजपुरोहित आहेत, तसे नागपुरात सावजी. पाटोडी रस्सा, गवार तिखा, सावजी मटका, सावजी पनीर ही सर्व सावजी कुळाची देण आहे. सावजी मटणला तर तोडच नाही. त्याच जातकुळीत सुंदरी, कलेजी, तुकडा या मांसाहारी पदार्थांना चवीने आपलेसे करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महालातील वाड्यांप्रमाणेच गोळीबार चौक, पाचपावली या भागातील कोष्टी-हलबा समाजबांधवांनी सावजी जेवणातील स्वत:चे वेळगेपण कायम ठेवले आहे. भाजी बनविण्यासाठी वापरण्यात येणारे गरम मसाले, त्यांचे प्रमाण, भाजी करताना देण्यात येणारी फोडणी आदी बाबतीत सावजींचा हात कुणी धरू शकत नाही. गंगाबाई घाट ते सेंट्रल एव्हेन्यू या सिमेंट मार्गावरील मागच्या बाजूने असलेल्या वस्तीत घरगुती सावजी खाणावळी दिसून येतात. घरगुती तसेच सावजी भोजनालय नावाने बरीचशी लहान-मोठी दुकाने गोळीबार चौक परिसरात आहेत. त्याशिवाय आता अनेकांनी महामार्गाच्या कडेला सावजी ढाबा सुरू केला आहे. त्या सर्वांचाच वेगवेगळा चाहता वर्ग आहे. जो हमखास आठवड्यातून, महिन्यातून ठराविक अंतराने सावजी भोजनाचा आनंद घेत असतो.

कोष्टी बांधवांकडून खरी जपणूक

नागपुरात आज अडीचशेहून अधिक सावजी हॉटेले आहेत. त्यापैकी खरे सावजी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले आहेत. आज बहुतांश हॉटेलांमध्ये जे सावजी मिळते, ती खऱ्या सावजीची पाककृती नाहीच. हा परंपरागत व्यवसाय बंद केलेल्या कुठल्याही कोष्टी बांधवाच्या घरी आजही जा आणि सावजीची फर्माईश करा. समोरून नकार येणे अशक्यच. खरी रेसिपी त्यांच्याच हातची, अन् जिभेवर कित्येक काळ रेंगाळणारी चवही…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sujay vikhe patil: ‘शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर? हे जनतेनेच ठरवावे’ – bjp mp sujay vikhe clears stand on k k range issue

अहमदनगर: ‘के के रेंज प्रश्नासंदर्भात आम्ही जी भूमिका तत्कालीन दौऱ्यात मांडली त्यावर आजही ठाम आहोत. त्या भूमिकेत कोणताही बदल नाही. त्यामुळे आता शरद...

sujay vikhe patil: ‘मी भाजपमध्ये नवीन आहे; खडसेंबद्दल काय बोलणार?’ – how can i comment on eknath khadse, says bjp mp sujay vikhe patil

अहमदनगर: 'भारतीय जनता पक्षात मी नवीन आहे. मला एकच वर्ष झालं आहे. त्यामुळं ४० वर्षे पक्षात असलेल्या व्यक्तीवर मी टीकाटिप्पणी काय करणार,' अशी...

Recent Comments