Home शहरं नागपूर Nagpur News : बारमधील मद्यसाठा तपासण्याचे आदेश - order to check liquor...

Nagpur News : बारमधील मद्यसाठा तपासण्याचे आदेश – order to check liquor stock in the bar


म.टा. प्रतिनिधी, नागपूर

जिल्ह्यातील बीअरबारमधील मद्यसाठ्याची विक्री करण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथे पडून असलेला साठा तपासून त्याचा अहवाल २४ मे रोजी सायंकाळपर्यंत सादर करा, असे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी जिल्ह्यातील सर्व निरीक्षक व दुय्यम निरीक्षकांना दिले.

राज्य सरकारने कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील बारमधून ऑनलाइन मद्यविक्रीला परवानगी दिली असली तरी अद्याप जिल्हा प्रशासनाने याबाबतचा आदेश काढला नसल्याने बारमधील मद्यविक्री बंद आहे. या बंद बीअरबारमध्ये लाखो लिटरचा मद्यसाठा पडून असून, बीअरच्या साठा कालबाह्य होऊ शकतो. बीअरची मुदत संपण्याच्या वाटेवर आहे. या मुदतीत बीअरबारमधून मद्यविक्री सुरू झाली नाही तर मुदत संपलेली बीअर फेकावी लागेल. या पार्श्वभूमीवर आता बारमधील मद्यसाठ्याची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले. १८ मार्च २०२०पर्यंत किती मद्यसाठा शिल्लक होता, तेवढाच विकता येणार आहे. त्यापेक्षा अधिकचा मद्यसाठा विकता येणार नाही. याबाबतचा स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे काढणार आहेत.

बीअरबारमधून होणारी मद्याची विक्री एमआरपी दराने करण्यास बारमालकांचा विरोध कायम आहे. बारमालकांना पाच टक्के अतिरिक्त व्हॅट द्यावा लागत असल्याने एमआरपीने घरपोच मद्यविक्री करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे नागपूर जिल्हा परमिट असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी सांगितले. यावर सरकारने सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा जयस्वाल यांनी व्यक्त केली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

fire at serum institute: सीरमच्या आगीमागे घातपाताचा संशय; CM ठाकरे स्पष्टचं बोलले – the covid vaccine is safe. i have not spoken to adar...

पुणेः सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आगीमागे विरोधकांनी घातपाताची शक्यता वक्तव्य केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना चांगलंच खडसावलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार...

nashik municipal corporation administration: ‘हात की सफाई’ला ब्रेक! – nashik mayor satish kulkarni is dadasaheb gailkwad assembly cleaning proposal sent return to nashik municipal...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकदादासाहेब गायकवाड सभागृहाच्या साफसफाईच्या नावाखाली कार्योत्तर मंजुरी देऊन ५६ लाख रुपये मक्तेदाराच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा आठवा प्रयत्न महासभेने हाणून...

Ian Healy: तुम्ही इतके वाइट खेळला की दुय्यम संघाने पराभव केला; ऑस्ट्रेलिया संघाला घरचा आहेर – ian healy strong comment on australia cricket team...

नवी दिल्ली: भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघावर जोरदार टीका होत आहे. देशातील माजी क्रिकेटपटूंनी संघाच्या कामगिरीवर घरचा आहेर दिला आहे. विशेषत:...

Recent Comments