Home शहरं नागपूर Nagpur News : बेंगळुरूचे विमान नागपूरला वळविले - the flight from bangalore...

Nagpur News : बेंगळुरूचे विमान नागपूरला वळविले – the flight from bangalore was diverted to nagpur


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

कोलकातावरून बेंगळुरूकडे निघालेले इंडिगोचे प्रवासी विमान खराब हवामानामुळे बुधवारी रात्री नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळविण्यात आले. तासाभरानंतर हवामानाचा अंदाज घेतल्यानंतरच हे विमान बेंगळुरूच्या दिशेने पुढील प्रवासासाठी झेपावले.

गेल्या काही दिवसांपासून खराब हवामानाचा फटका विमान वाहतुकीला बसत आहे. विशेषतः अम्फान वादळानंतर काही दिवस कोलकाता येथून विमानांचे उड्डाण बंद करण्यात आले होते. आता ते पूर्ववत होत नाही, तोच बुधवारी हा प्रकार घडला. इंडिगो कंपनीचे विमान कोलकाता येथून बेंगळुरूसाठी निघाले. मात्र, प्रवासादरम्यान हवामान योग्य नसल्यामुळे विमान रात्री ८.२३ वाजता नागपूरला हलविण्यात आले. नागपूरला हे विमान तासभर थांबले. यामध्ये एकूण १०१ प्रवासी होते. तासाभराच्या विश्रांतीनंतर हवामानाचा अंदाज घेण्यात आला. त्यानंतर रात्री ९.२५ वाजता विमान पुन्हा एकदा बेंगळुरूच्या दिशेने निघाले.

…………Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gujarat: Gujarat: २२ वर्षीय तरुणी वॉकसाठी बाहेर पडली, दुचाकीस्वार आला अन् – 22 year old girl molested by unknown man while evening walk in...

अहमदाबाद: २२ वर्षीय तरुणी इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडली असताना, दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत...

नगरसेवकाला जिवे मारण्याची धमकी

म. टा. वृत्तसेवा, पनवेल पनवेलमधील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांनी प्रभागातील बेकायदा बांधकामाची तक्रार पनवेल महापालिकेत केली म्हणून त्यांना जिवे ठार मारण्याची ...

Recent Comments