Home शहरं नागपूर Nagpur News : ब्रिंक्सच्या कर्मचाऱ्याने दिली टीप - note given by an...

Nagpur News : ब्रिंक्सच्या कर्मचाऱ्याने दिली टीप – note given by an employee of brinks


म.टा. प्रतिनिधी, नागपूर

सिव्हिल लाइन्समधील १८ लाख रुपयांच्या दरोड्याचा पर्दाफाश करण्यात गुन्हेशाखा पोलिसांनी यश आले आहे. याप्रकरणी ब्रिंक्स सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पाच दरोडखोर पसार आहेत. ब्रिंक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच या दरोड‌याची टीप दिल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींत योगेश विनायक सत्रमवार (वय ३२), त्याचा नातेवाइक मंगेश वासुदेव पद्मगीरवार (वय ३३ दोन्ही रा. गोपाल कृष्णनगर, वाठोडा), आकाश मोरेश्वर धोटे (वय २१, रा. नागेश्वरनगर, पारडी) व निक्की ऊर्फ निखिल धनराज गोखले (वय २०,रा. मस्कासाथ) यांचा समावेश आहे. छावणीतील खंडेश्वर व अन्य चौघे फरार आहेत. पाचही कुख्यात गुन्हेगार आहेत.

योगेश हा पाच वर्षांपासून ब्रिंक्स कंपनीत काम करतो. त्याने कंपनीने जमा केलेली रोख लुटण्याची योजना आखली. याबाबत मंगेशला सांगितले. मंगेशने खंडेश्वरला टीप देत माणसे जमविण्यास सांगितले. सात आठ दिवसांत खंडेश्वरने लुटीसाठी टोळी गोळा केली. त्यानंतर सहा जणांनी दरोड्याचा कट आखला. सोमवारी दुपारी सिव्हिल लाइन्स परिसरात चाकूचा धाक दाखवून ब्रिंक्स कंपनीचे कर्मचारी श्रीकांत इंगळे (रा. सरईपेठ, इमामवाडा) व सतीश धांदे (रा. दिघोरी) यांच्याकडील १८ लाखांची रोख हिसकावण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मयूर चौरसिया, राजकुमार त्रिपाठी, हेडकॉन्स्टेबल शंकर शुक्ला, रवींद्र गावंडे, नरेंद्र, सागर, कुणाल, रोहित, देवीप्रकाश यांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. माहितीच्या आधारे पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून सव्वा सहा लाखांची रोख व दोन मोटरसायकली जप्त केल्या.

गाडीच्या क्रमांकावरून सुगावा

घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू केला. एका फुटेजमध्ये मोटरसायकलचा क्रमांक स्पष्टपणे पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याआधारे मालकाचा शोध घेतला. गाडी मालक कुही येथील असल्याचे समोर आले. गुन्हेशाखा पोलिस कुही येथे गेले. मालकाची चौकशी केली असता ही गाडी योगेश सत्रमवारला विकल्याचे मालकाने सांगितले. त्याचा पत्ता घेत पोलिस नागपुरात आले. योगेशला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर दरोड्याचा संपूर्ण घटनाक्रमच समोर आला.

एक लाखाचे बक्षीस

२४ तासांत दरोड्याचा पर्दाफाश केल्याने पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हेशाखेच्या पथकाला एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांनीही पथकाचे कौतुक केले आहे.Source link

  • Tags
  • d

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Deepesh Sawant’s Allegations Are False, NCB Tells To Bombay High Court – सुशांतसिंह आत्महत्या: दीपेश सावंतचे ‘ते’ आरोप खोटे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मदतनीस दीपेश सावंत याने एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलावले...

Recent Comments