Home शहरं नागपूर Nagpur News : भाजपचे आंदोलनाचे अस्त्र - bjp's weapon of agitation

Nagpur News : भाजपचे आंदोलनाचे अस्त्र – bjp’s weapon of agitation


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

सर्वत्र करोनाविरुद्ध लढा सुरू असताना ‘आम्ही राजकारण करत नाही,’ असे वारंवार सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढले आहे. आज, मंगळवारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, तर येत्या शुक्रवारी कार्यकर्ते घराबाहेर उभे राहून सरकारचा निषेध करतील.

करोनावरील उपाययोजना व सोयी उपलब्ध करून महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला आहे. रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ आहे. मुंबईची स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत आहे. विलगीकरण केंद्रात सोयींचा अभाव असल्याने या ठिकाणी संशयित बरे होण्याऐवजी प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. रेशनकार्डधारकांनाही धान्य मिळत नाही तर, कार्ड नसलेल्यांची स्थिती आणखी भीषण झाली आहे. पोलिसांवरील हल्ले रोखण्यात सरकारला यश आले नसल्याची टीका भाजपने केली आहे. यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील पदाधिकारी व प्रमुख नेत्यांशी सोमवारी संवाद साधला. यात आंदोलनाची माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांचे हाल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी साखर कारखान्यांसाठी आवाज उठवला. मात्र, शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या लाखो क्विंटल कापसासाठी एक शब्दही ते बोलत नाही. सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठेच दिसत नाही. राज्यातील मंत्र्यांमध्ये कुरघोडी सुरू असल्याने कामे प्रभावित झाली आहेत. सरकारने वीज बिल माफ केलेले नाही. परिवहन मंडळाच्या सर्व बसेसद्वारे मोफत प्रवास सुरू करावा. शेजारच्या राज्यात अडकलेल्यांनाही घेऊन यावे. याबाबत मंगळवारी निवेदन दिल्यानंतर येत्या शुक्रवारी भाजपचे सर्व कार्यकर्ते स्वतःच्या घरासमोर हातात फलक घेऊन आणि काळे वस्त्र व मास्क लावून सरकारचा निषेध करणार आहेत. राज्यानेही पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी रेटण्यात येणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

covid 19 vaccine: करोना लसः रजिस्ट्रेशन करताना ‘या’ चुका करू नका – covid 19 vaccine online 5 things to be careful about while registering

हायलाइट्स:करोना लस देशात उपलब्ध असून ती अनेकांनी घेतली आहे लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे या लस संबंधी कोणीही काहीही मागितले तर त्यावर...

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Religious Freedom Act: Love Jihad : मध्य प्रदेश विधानसभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर – mp religious freedom act aims to penalize love jihad...

हायलाइट्स:याआधी, धर्मस्वातंत्र्य अध्यादेशाला राज्यपालांनी दिली होती मंजुरी'लव्ह जिहाद' विरोधात कडक शिक्षेची तरतूद१-१० वर्षांची कैद आणि १ लाखांपर्यंतच्या आर्थिक दंडाची तरतूदभोपाळ : मध्य प्रदेशात...

Recent Comments