Home शहरं नागपूर Nagpur News : भाजयुमो पदाधिकाऱ्याचा गळा चिरून खून - murder of bjp...

Nagpur News : भाजयुमो पदाधिकाऱ्याचा गळा चिरून खून – murder of bjp office bearer by slitting his throat


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राज विजयराज डोरले (वय २८, रा. भुतेश्वरनगर) यांची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री महालमधील भुतेश्वरनगरमध्ये घडली. राज यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन मारेकऱ्यांना अटक केली. मुकेश निळकंठ नारनवरे (वय २७) व अंकित विजयराज चतुरकर (वय २१, दोन्ही रा. भुतेश्वरनगर),अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी मुकेशचा सारंग बावनकुळे नामक युवकासोबत वाद झाला होता. त्यावेळी राज यांनी सारंगच्या बाजूने उभे राहात मुकेशला फटकारले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. गुन्हा दाखल झाल्याने मुकेश संतापला होता. याबाबत कळताच राज यांचे विरोधकही सक्रिय झाले होते. त्यांनी मुकेशला हाताशी धरले. राज यांच्या हत्येचा कट आखला. मुकेशने अंकितलाही कटात सहभागी करून घेतले. सोमवारी रात्री राज मोटरसायकलने जात असताना भुतेश्वरनगर परिसरात मुकेश व अंकित या दोघांनी त्यांना अडविले. त्यांनी राजच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. अंकितने बॅटचे प्रहार राज यांच्या डोक्यावर केले, तर मुकेशने चाकूने राजचा गळा चिरला. राज यांचा मृत्यू झाला. मारेकरी पसार झालेत. यानंतर नागरिक जमले. एका नागरिकाने कोतवाली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. शोध घेऊन दोघांना अटक केली. राज हे अविवाहित होते. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ व बहीण आहे.

राजचा दबदबा वाढत होता…

राज हे प्रॉपर्टी डिलर होते. सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असायचे. राजकारणातही त्यांचा दबदबा वाढायला लागला होता. त्यामुळे त्यांचे विरोधक सक्रिय झाले होते. याचदरम्यान मुकेशचा राजसोबत वाद झाल्याचे विरोधकांना कळले. त्यांनी मुकेशला सुपारी देऊन राजची हत्या करायला लावली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पोलिसांनी या हत्याकांडाचा सखोल तपास केल्यास अनेक धक्कादायक तथ्य समोर येण्याची शक्यता आहे. या हत्याकांडात चारपेक्षा अधिक मारेकऱ्यांचा समावेश असल्याचे कळते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Thane News : Jameel Sheikh: मनसे पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या; ठाणे शहर हादरले – mns leader jameel sheikh shot dead in thane

ठाणे:ठाणे शहरातील राबोडी भागात मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जमील हे बाइकवरून निघाले...

Recent Comments