Home शहरं नागपूर Nagpur News : मद्यविक्रीत काळाबाजार - the black market in alcohol

Nagpur News : मद्यविक्रीत काळाबाजार – the black market in alcohol


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

पोलिस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात ऑनलाइन आणि ग्रामीणमध्ये थेट मद्यविक्रीसह ऑनलाइन मद्यविक्री सुरू झाली आहे. मात्र तीन दिवसांत नियमांना धाब्यावर ठेवून काळाबाजाराला ऊत आला असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. ‘एमआरपी’पेक्षा अधिक दरात मद्यविक्री करणे यासह विविध दलालांच्या माध्यमातून अधिक किमतीत मद्य विकले जात आहेत. ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप…’ अशा पद्धतीने वागून मद्यविक्रेते आणि मद्यपींकडून नियमांचे उल्लंघन होत आहे.

नागपूर जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी देताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुरक्षित वावरचे उल्लंघन होऊ नये, यासाठी काही नियमांचे काटोकोर पालन होण्याचे निर्देश दिले. या आदेशातून १५ मेपासून मद्यविक्रीला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी सुरक्षित वावरचा फज्जा उडाला. शहरालगत असलेल्या मद्यविक्री केंद्रांवर झालेली गर्दी आवरणे प्रशासनाला अवघड झाले. त्यामुळे २४ तासांच्या आत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शहरालगत असलेल्या पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील थेट मद्यविक्री बंद केली. पोलिस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात आता मद्य घेण्यासाठी ऑनलाइनचा एकच पर्याय असल्याने सर्व ग्राहक व्हॉट्सअप किंवा मोबाइल नंबरवर मद्याची मागणी करू लागले. एमआरपीपेक्षा अधिक दराने मद्यविक्री करू नये, असे आदेश असतानाही काही दुकानदारांकडून अधिक दराने मद्यविक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. मद्यपींचीही ती गरज असल्याने कुणी उघडपणे बोलायला तयार नाही.

दलालांकडून मद्यविक्री

लॉकडाउनमुळे अनेकांकडे आता रोजगार नाही. त्यामुळे मद्य खरेदी करण्यासाठी लाइनमध्ये लागणारा वर्ग तयार झाला आहे. मद्य खरेदी करायचे आणि ते चढ्या दराने विकायचे, हा नवा उद्योग आता सुरू झाला असून, या उद्योगाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. एका दिवसासाठी ५ रुपयांत मद्यपरवाना देण्याची सुविधा मद्यालयातच उपलब्ध करून दिली आहे, मात्र यासाठीही अधिक पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडेही अशा तक्रारी पोहोचल्या असल्या असून, यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. ऑनलाइन परवाने मिळण्यात अनेक अडचणी जात आहे. सर्व्हर डाउन असल्याने ऑनलाइन परवाना मिळत नसल्याची तक्रार काहींनी केली.

लेना है तो लो…!

ऑनलाइन मद्यविक्रीची व्यवस्था मद्यविक्रेत्याला करायची असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यानुसार मद्यविक्रेत्यांनी आपले व्हॉट्सअॅप नंबर, एसएमएससाठी मोबाइल नंबर दुकानासमोर लावले आहेत. या क्रमांकावर काही युवकांनी कॉल केला असताना त्यांना आलेला अनुभव धक्कादायक होता. मद्य हवे आहे तर त्यासाठी आधी २५ टक्के रक्कम जमा करा, त्यानंतरच मद्य मिळेल, असे दुकानदाराने सांगितले. सर्व्हिस चार्जच्या नावानेही पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. अधिकचे पैसे का आकारता, असा प्रश्न केल्यानंतर दुकानदाराकडून ‘लेना है तो लो…. हमारे पास टाइम नहीं है…’ असे उत्तर दिले जात असल्याची व्यथा नागपुरातील काही युवकांनी ‘मटा’कडे व्यक्त केली.

बंद दुकानांसमोरही गर्दी

महापालिका क्षेत्र आणि पोलिस आयुक्त यांच्या क्षेत्रातील मद्यविक्री केंद्र बंद आहेत. या केंद्रांवरून केवळ ऑनलाइन मद्यविक्री सुरू आहे. मात्र असे असतानाही अनेक दुकानांसमोर मद्यप्रेमींची गर्दी बघायला मिळत आहे. दुकानाच्या आडून त्यांना माल पुरविला जात आहे. काही जण तर मद्य पिण्याचा परवाना नसतानाही मद्यविक्री करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मद्य पोहचणविणारा केवळ १ किलोमीटरच्या आत होम डिलेव्हरी देतो. मद्याची कृत्रिम टंचाई करून हा काळाबाजार सुरू असल्याचे वास्तव आहे.

……..Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

young woman murder in mhasrul nashik: म्हसरूळ शिवारात महिलेचा खून – 23 years old young woman murdered by unknown person in nashik

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीम्हसरूळ शिवारातील पेठरोड परिसरातील पवार मळ्यानजिकच्या नाल्याजवळ महिलेचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री...

cold storage project in aurangabad: ‘कोल्ड स्टोअरेज’ला मुहूर्त मिळेना – work on the aurangabad cold storage proposal has not started even after 8 months

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रस्तावित 'कोल्ड स्टोअरेज'च्या कामास आठ महिन्यांनंतरही मुहूर्त लागला नाही. संबंधित कंपनीने 'लिज प्रीमियम'पोटी...

Recent Comments