Home शहरं नागपूर Nagpur News : मनपाच्या करोना योद्ध्यांची होणार गरजेनुसार तपासणी - corporation's corona...

Nagpur News : मनपाच्या करोना योद्ध्यांची होणार गरजेनुसार तपासणी – corporation’s corona warriors will be investigated as required


आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

मनपाचे कर्मचारी रोज कंटेन्मेंट झोन व इतर क्षेत्रांत जाऊन तपासणी करीत आहेत. त्यांची तपासणी कधी करायची, हे आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरविण्यात येत आहे. याचा अर्थ या योद्ध्यांची तपासणी करायचीच नाही, असे न्यायालयात सांगितलेले नाही. लक्षणे आढळलेल्या ४३ जणांची तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती मनपाचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी व नोडल अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांनी दिली.

मोमिनपुरा व सतरंजीपुरा येथील करोना योद्ध्यांच्या तपासणीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. यात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धक्कादायक शपथपत्र सादर करीत अशा योद्ध्यांची तपासणी करायची गरज वाटत नाही, असे म्हटले. यासंदर्भात डॉ. गंटावार यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘करोना काळात कंटेन्मेंट क्षेत्रासह इतरही भागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी मनपाला आहे. आयसीएमआरने अशा कर्मचाऱ्यांबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्यात लक्षणे आढळणाऱ्या व न आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेले सर्व ४३ जण निगेटिव्ह निघाले. मनपा कर्मचारी रोज करोना तपासणीसाठी फिरत आहेत. आज तपासणी केली तर, उद्याही करावीच लागेल. त्यामुळे तपासणीची गरज व लक्षणे दिसताच तपासणी केली जाते. याचा गैरअर्थ काढण्यात येऊ नये’, याकडे डॉ. गंटावार यांनी लक्ष वेधले. दरम्यान, मनपाची एक परिचारिका करोना संशयिताच्या संपर्कात आली होती. ती दम्याची आजारी होती. हे उदाहरण वगळता मनपाचा एकही कर्मचारी सुदैवाने आतापर्यंत पॉझिटिव्ह वा इतरांच्या संपर्कामुळे संक्रमित झाला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

President Ramnath Kovind: president speech on republic day : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन… – president ramnath kovind speech on republic day live...

नवी दिल्लीः देश उद्या आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. करोना संकटाच्या स्थितीत आणि चीन, पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती देशाला...

Recent Comments