Home शहरं नागपूर Nagpur News : ‘मेडिकल’ला ओबीसींनाफक्त ३.८ टक्के आरक्षण - only 3.8 per...

Nagpur News : ‘मेडिकल’ला ओबीसींनाफक्त ३.८ टक्के आरक्षण – only 3.8 per cent reservation for obcs in ‘medical’


म. टा. वृत्तसेवा, गोंदिया

ओबीसींना २७ टक्के आरक्षणाची तरतूद असताना यंदाच्या वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेत केवळ ३.८ टक्केच आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांवर हा अन्याय असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महाहसंघ व गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने केला आहे. याविरोधात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी ६६ हजार ३३३पैकी १५ टक्के म्हणजे ९ हजार ९५० जागा केंद्रीय कोट्यात आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या कोट्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वाट्याला २७ टक्‍के आरक्षणानुसार २ हजार ५७८ जागा येणे अपेक्षित होते. परंतु केवळ ३७१ जागा म्हणजे ३.८ टक्के आरक्षण मिळाले आहे. याउलट अनुसूचित जातीतील उमेदवारांना १ हजार ३८५ (१५ टक्के) आणि अनुसूचित जमातीला ६६९ (७.५ टक्के) एवढ्या नियमानुसार जागा मिळाल्या. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तब्बल ७ हजार १२५ जागा देण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांत वैद्यकीय समितीकडून हे सातत्याने होत असल्याचा आरोपही ओबीसींनी केला आहे.

केंद्रीय शैक्षणिक संस्था, केंद्रीय महाविद्यालय आणि केंद्रीय विद्यापीठात ओबीसी विद्यार्थ्यांना २७ टक्के आरक्षण देण्यात येत असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही वैद्यकीय महाविद्यालयांत अनुसूचित जाती आणि जमातीप्रमाणे ओबीसींना त्यांच्या हक्काचे आरक्षण का दिले जात नाही, असा सवालही ओबीसींनी केला आहे. याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ व गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, कैलास भेलावे, सावन डोये, ओबीसी सेवा संघ तालुकाध्यक्ष डॉ. संजीव रहगंडाले, सुनील कावळे, प्यारेलाल तुरकर व पदाधिकाऱ्यांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. पंतप्रधानांना निवेदनही पाठविले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आजचं राशीभविष्य… दिनांक २९ नोव्हेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक २९ नोव्हेंबर २०२० Source link

दीडदमडी : अवघी झाली गंमत…

गेल्या वर्षी २३ नोव्हेंबरला नेमकं काय झालं, यावर बरीच पुस्तकं येत आहेत. प्रत्येकाला दिसणारं सत्य वेगळं असतं, त्यामुळे या पुस्तकांमधून वेगवेगळं सत्य जगापुढे...

Recent Comments