Home शहरं नागपूर Nagpur News : मेडिकल अंतिमच्या परीक्षेवर तक्रारी - complaints on medical final...

Nagpur News : मेडिकल अंतिमच्या परीक्षेवर तक्रारी – complaints on medical final examination


वेळापत्रकावरून नाराजी; अभ्यासाचे साहित्य नसल्याचा दावा

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमबीबीएस व एमडी अंतिम वर्षच्या परीक्षा घेण्याची घोषणा केली असली तरीही त्याला काही विद्यार्थ्यांकडून आता विरोध होत आहे. अनेक विद्यार्थी हे करोना रुग्णालयात काम करीत आहेत, तर अनेकांनी कॉलेज सोडून गावी निघून गेले आहेत. त्यामुळे अभ्यासासाठी वेळच नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

राज्याचे आरोग्य शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन वैद्यकीय विद्याशाखेच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यास मंजुरी मिळवली. ही परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे. परंतु, या परीक्षेवर आता काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आक्षेप घेणे सुरू केले आहे. अवघ्या काही दिवसात सहा ते आठ पेपर घेण्यात येणार आहे. कोणत्याही पेपरमध्ये पुरेसा कालावधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे परीक्षा कशाही प्रकारे उरकण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. लॉकडाउनमुळे वसतिगृहात राहणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या घरी परतले आहेत. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाची सगळी साधने वसतिगृहात राहिली आहेत. त्यास्थितीत त्यांना अभ्यासासाठी कोणतेही साधन सध्या उपलब्ध नाही. त्यासोबतच परीक्षेसाठी पुन्हा त्यांच्या शहरातून दुसऱ्या शहरात जावे लागणार आहे. तेव्हा कॉलेजमध्ये परतण्यासाठीदेखील काही कालावधी देण्यात यावा, करोनामुळे शासकीय रुग्णालयात अनेक अंतिम सत्रातील विद्यार्थी सेवा देत आहेत. इंटर्न म्हणून त्यांना १२ तासांहून अधिक काळ काम करावे लागत आहे. त्यांच्याही भविष्याचा विचार करून परीक्षेचे नियोजन करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mehbooba mufti: ‘मेहबूबांनी पाकिस्तानात जावे, हवे तर मी तिकीट काढून देतो’ – deputy cm of gujrat nitin patel attacks on mehbooba mufti saying she...

अहमदाबाद: गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कलम ३७०...

blast in Pakistan: Pakistan blast पाकिस्तान: पेशावरमध्ये मदरशात भीषण स्फोट; सात ठार, ७० जखमी – pakistan blast news blast near madrasa in peshawar

पेशावर: पाकिस्तानमधील पेशावर येथील डार कॉलनीत भीषण स्फोट झाला आहे. मदरशात झालेल्या या स्फोटात सातजण ठार झाले असून जवळपास ७० जखमी झाले आहेत....

RBI issue notification on interest waive off: चक्रवाढ व्याजमाफी ; रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब, बँकांना दिले निर्देश – rbi issue notification regarding waive off compound...

मुंबई : करोना संकटात कर्जदारांना दिलासा देणाऱ्या केंद्र सरकारच्या व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा मार्ग आज मंगळवारी मोकळा झाला आहे. ही योजना मान्य करत...

Recent Comments