Home शहरं नागपूर Nagpur News : मोबाइल, संगणक दुरूस्ती दुकानांना परवानगी - mobile, computer repair...

Nagpur News : मोबाइल, संगणक दुरूस्ती दुकानांना परवानगी – mobile, computer repair shops allowed


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

लॉकडाउन-४ची अंमलबजावणी ३१ मे पर्यंत होणार आहे. अशात शहरातील काही आस्थापनांना सुरू करण्याची परवानगी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. त्यानुसार मोबाइल, संगणक दुरूस्तीची दुकाने दुचाकी, चारचाकी दुरूस्त करणाऱ्या मेकॅनिकचे वर्कशॉप, सुरू राहतील. वाहनांच्या चाकांचे पंक्चर दुरूस्ती दुकानांनाही सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाउनमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांनुसार शिथिलता दिली आहे.

यापूर्वी शहरात परवाना असलेल्यांना ऑनलाइन घरपोच मद्यविक्रीला परवानगी मिळाली आहे. आता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह अन्य प्रतिष्ठानांनाही लॉकडाउनमधुन शिथिलता देण्यात आली आहे.

व्यवसायासाठी वेळापत्रक

सोमवार, बुधवार, शुक्रवार

इलेक्ट्रिक दुकाने, कुलरविक्री प्रतिष्ठाने, संगणक, मोबाइल दुरूस्तीची दुकाने, गृहपयोगी वस्तूंची दुकाने, हार्डवेअर व बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स.

मंगळवार, गुरूवार, शनिवार, रविवार

ऑटो स्पेअर पार्ट्स, ऑटोमोबाइल दुरूस्तीचे वर्कशॉप, गॅरेज, वाहनाच्या चाकांची पंक्चर दुरूस्ती दुकाने, टायर शॉप, ऑइल व लुब्रीकेट्स शॉप, चष्मा, स्टेशनरी, होजिअरी शॉप आदी प्रतिष्ठाने.

स्वतंत्र पासची गरज नाही

लॉकडाउनमधुन या प्रतिष्ठांनाना सूट देण्यात आल्याने व्यावसायिकांना शहरातून प्रवास करण्यासाठी वेगळी परवानगी किंवा पासची गरज भासणार नाही, असे आदेशात नमूद आहे. दुकानांच्या वेळा सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत राहतील. सायंकाळी सातनंतर घराबाहेर निघण्यास परवानगी नसेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Rishabh Pant: ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला – icc test ranking rishabh pant is the best wicket-keeper...

दुबई: icc test ranking ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत नाबाद ८९ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून देणाऱ्या ऋषभ पंत (rishabh pant)ला एक मोठे बक्षिस...

सिद्धार्थ आनंद: सहाय्यक दिग्दर्शकाने मारलंच नाही, जाणून घ्या ‘पठाण’च्या सेटवर नक्की काय घडलं – story behind pathan movie director siddharth anand fight

मुंबई-शाहरुख खान यांच्या आगामी 'पठाण' सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आणि त्याच्या सहाय्यक दिग्दर्शकामध्ये मोठं भांडण झाल्याचं बोललं जात आहे. हे भांडण...

Recent Comments