Home शहरं नागपूर Nagpur News : रस्त्यांवर थुंकणे, धूम्रपान केल्यास दंड, शिक्षा - spitting on...

Nagpur News : रस्त्यांवर थुंकणे, धूम्रपान केल्यास दंड, शिक्षा – spitting on the streets, fine for smoking, punishment


म. टा. प्रतिनिधी, नागपूर

करोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. आता विविध कायद्यांतर्गत उपराजधानीत सार्वजनिक‍ ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या व पान, सुपारी, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या, थुंकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी मनपाच्या उपद्रव शोध पथकासह (एनडीएस) विविध अधिकाऱ्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात १ जून रोजी स्वतंत्र आदेश काढले असून, नागपुरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास, थुंकण्यास व धूम्रपानास (ई-सिगारेटसह) प्रतिबंध करण्यात आला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ आणि आपत्तीव्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींच्या अधिन राहून तसेच भादंविच्या तसेच मुंबई पोलिस अधिनियमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, धूम्रपान करणाऱ्यास मुंबई पोलिस अधिनियम कलम ११६अ नुसार पहिल्या गुन्हासाठी १ हजार रुपये दंड व एक दिवस सार्वजनिक सेवा करावी लागेल. त्याच व्यक्तीला दुसऱ्या गुन्हासाठी ३ हजार रुपये दंड व तीन दिवस सार्वजनिक सेवा आणि तिसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड आणि चार दिवस सार्वजनिक सेवा अशा शिक्षेची तरतूद आहे.

भारतीय दंड संहिता, १८६० च्या कलम २६९ अंतर्गत सहा महिने शिक्षा किंवा दंड‍, कलम २७० अंतर्गत दोन वर्षे शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम २७२ अंतर्गत सहा महिने शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही, कलम २७८ अंतर्गत रुपये पाचशेपर्यंत दंड ची तरतूद आहे.

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनियमन आणिवाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण) कायदा २००३ च्या कलम ४ अंतर्गत दोनशे रुपयांपर्यंत दंड, कलम ५ अंतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्षे शिक्षा किंवा दोन्ही, दुसऱ्या गुन्ह्यासाठी ५ हजारांपर्यंत दंड किंवा पाच वर्षे शिक्षा, कलम ६ अ, ६ ब साठी दोनशे रुपयांपर्यंत दंड, कलम ७ अंतर्गत उत्पादकाला पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्षे शिक्षा किंवा दोन्ही तसेच दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजारांपर्यंत दंड किवा पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. विक्रेत्यांना पहिला गुन्ह्याला १ हजारांपर्यंत दंड किंवा एकवर्षाची शिक्षा आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी ३ हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन वर्षे अशी शिक्षेची तरतूद करण्यात आले आहे. हे आदेश नागपूर महानगरपालिका हद्दीतील शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, विविध मंडळे, परिमंडळ, महामंडळे, औद्योगिक वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वे स्थानके, बसस्थानके, न्यायालयीन संस्था, देवस्थाने, बगीचे, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, तरणतलाव, सिनेमागृह, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक क्षेत्रांच्या ठिकाणी आणि आवारातही हा लागू राहील.या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, संबंधित झोनचे सहायक आयुक्त व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे नागपूर मनपातील संबंधित अधिकारी, नागपूर मनपा हद्दीतील सर्व संबंधित पोलिस उपनिरीक्षक वत्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे विविध पोलिस अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. नागरिकांनी या शहराची स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुरक्षेची जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

…….Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Crisis: शाळा उघडली, तरीही… – sujata patil article on corona crisis impact on education system

सुजाता पाटीलकरोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरीत्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला असून, शिक्षण क्षेत्राला तर समूळ हादरा बसला.मार्च महिन्यापासून...

BSF Jawan in Honey Trap: बीएसएफ जवानांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘त्याने’ पाकिस्तानी महिलेला अॅड केले! – bsf jawan from ahmednagar honey-trapped by pakistani agent

अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक...

andre russell: IPLमध्ये अपयशी; आता १४ चेंडूत केल्या ५० धावा! – lpl 2020 andre russell hits fifty in 14 ball in lanka premier league

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. करोना व्हायरसनंतर क्रिकेट...

Recent Comments