Home शहरं नागपूर Nagpur News : रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री सुरू - food sales start...

Nagpur News : रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ विक्री सुरू – food sales start at the railway station


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

करोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर १ जूनपासून देशात २०० रेल्वेगाड्या धावत आहेत. त्यातील २२ गाड्या नागपूरमार्गे जातील. प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून देशातील विविध रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू करण्याचे निर्देश रेल्वेने निर्देश दिले आहेत.

रेल्वेने नवा आदेश दिल्यानंतर नागपूर रेल्वे स्थानकावरही खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. यात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील कमसम रेस्टारेंटचा समावेश आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन करण्यात आला. मार्चच्या शेवटी देशभरातील प्रत्येक रेल्वे स्थानक बंद करण्यात आले. त्यामुळे खाद्यपदार्थांचे स्टॉलही बंद होते. रेल्वेच्या पार्सल आणि श्रमिक गाड्या सुरू होत्या. काही कालावधीनंतर रेल्वेने राजधानी गाड्या चालविल्या. श्रमिक रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना रेल्वेने मोफत भोजन-पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. आता सोमवारपासून अनेक रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थांचे स्टॉल सुरू झाले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments