Home शहरं नागपूर Nagpur News: विदर्भाची रुग्णसंख्या २१२वर - the number of patients in vidarbha...

Nagpur News: विदर्भाची रुग्णसंख्या २१२वर – the number of patients in vidarbha is 212


टीम मटा

करोनाचा संगर्स दिवसागणिक वाढू लागला असतानाच विदर्भात शनिवारी २८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. यवतमाळमध्ये सर्वाधिक २०, अमरावतीत पाच तर नागपुरातील तिघांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २१२वर पोहचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवस यवतमाळ बंदचे आदेश दिले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला भाग सील करण्यात आला आहे. तर दुसरीकडे बुलडाणा आणि वाशम जिल्ह्यातील चार करोनाबाधितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

यवतमाळात वीस पॉझिटिव्ह

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डमधील २० जणांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ४६वर पोहचली आहे. यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. शहरातील पवारपुरा आणि इंदिरानगर भागात काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. या सर्वांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. शनिवारी दुपारी आणि सायंकाळच्या सुमारास आले. पहिल्या टप्प्यात एक, नंतर १५ तर सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पुन्हा चार अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकाच दिवशी आढळलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वीसवर पोहचली आहे. सध्या आयसोलेशन वॉर्डात ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १२ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने इंदिरानगर आणि पवारपुरावर लक्ष केंद्रित केले आहे. हा भाग प्रशासनाने आधीच सील केला आहे. शुक्रवारी रात्री जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी या भागात फिरून उपाययोजनांची पाहणी केली. या भागात मागील चौदा दिवसांपासून सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा, मदतनीस व आरोग्य सेवक यांना क्वारंटाइन करून दुसऱ्या चमूकडे सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

बंदचा दुसरा दिवस

यवतमाळ शहरात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी तीन दिवस यवतमाळ पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला. केवळ दुधाची दुकान मर्यादित वेळेसाठी सुरू आहेत. शनिवारी या बंदचा दुसरा दिवस होता. रस्त्यांवर एरवी तुरळक दिसून येणारी गर्दीही थांबली होती.

अमरावती ‘रेड झोन’मध्ये

अमरावती : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १९वर पोहोचली आहे. शुक्रवारी ही संख्या आठवरून चौदावर पोहोचली असताना मध्यरात्री आलेल्या अहवालात आणखी दोन पुरुषांना संसर्ग झाल्याचे पुढे आले. शनिवारी सायंकाळी त्यात नव्या तिघांची भर पडली. या वाढत्या रुग्णसंख्येने अमरावती जिल्हा आता ‘रेड झोन’मध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कमेला ग्राऊंड व हैदरपुरा येथील दोघांना शुक्रवारी मध्यरात्री करोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. दोन्ही व्यक्ती करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्या होत्या. कमेला ग्राउंड व हैदरपुरा येथील महिलांचे गत २० तारखेला निधन झाले होते. त्यांचे थ्रोट स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यातीलच हे दोघे आहेत. यानंतर शनिवारी सायंकाळी सहा वाजता आलेल्या अहवालात आणखी तिघे पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये कोवीड रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झालेला युसूफनगरातील एका, बडनेऱ्यातील ५३ वर्षीय व्यक्ती आणि तारखेडा येथे दगावलेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या अन्य एकाचाही समावेश आहे. अमरावतीमध्ये करोना रुग्णांची संख्या १९वर पोहोचल्याने केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार अमरावती रेड झोनमध्ये दाखल होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील संचारबंदी आता आणखी कठोरपणे राबविली जाणार आहे.संचारबंदीच्या शिथिलतेत दोन तासांची घट करण्यात आली आहे.

सलग सहाव्या दिवशीचे अहवाल निगेटिव्ह

अकोला : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी २४ अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातून एकूण ५३७ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५२४ अहवाल आले आहेत. ५०८ अहवाल निगेटिव्ह तर १३ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एकूण १६ करोनाबाधित रुग्ण होते. त्यातील दोघांचा मृत्यू तर सात जणांना सुट्टी देण्यात आली आहे. सध्या सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. मात्र नागपूर व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही कुणी प्रवेश केल्यास १४ दिवस क्वारंटाइन करण्यात येत आहे. गावामध्ये अचानक साथ उद्भवल्यास काय करायचे, कशा पद्धतीने व्यवस्था करायची, यासाठी शनिवारी चंद्रपूर शहरातील तीन प्रभागांमध्ये रंगीत तालीम करण्यात आली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik Road railway station: नाशिकरोडला २१ रेल्वे प्रवासी संशयित – 21 train passengers found corona suspected on nashik road railway station

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड करोनाची लाट रोखण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकात आजपासून प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रीनिंग...

‘करोना’चा ‘जीएसटी’ला फटका

म. टा. प्रतिनिधी, लॉकडाऊन, करोनाचे संकट याचा मोठा फटका राज्य कर विभागाला ( सीजीएसटी) बसला आहे. गेल्या सहा महिन्यात औरंगाबाद विभागात केवळ ५२६...

Rohit Sharma: AUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल – aus vs ind: lokesh rahul, mayank agarwal...

सिडनी, AUS vs IND: रोहित शर्माने आतापर्यंत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. रोहितच्या दमदार सुरुवातीच्या जोरावर भारताने बरेच सामने जिंकले...

Kangana Ranaut Share Photo With Sanjay Dutt Netizen Trolled Her – संजय दत्तला भेटायला गेली कंगना रणौत, यूझर्स म्हणाले- शेवटी नेपोकिड, चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या कंगना रणौत तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान,...

Recent Comments