Home शहरं नागपूर Nagpur News : विद्यापीठनिहाय धोरण आखावे - university wise policy should be...

Nagpur News : विद्यापीठनिहाय धोरण आखावे – university wise policy should be followed


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत सुरू झालेला घोळ अद्यापही संपेनासा झाला आहे. या मुद्द्यावरून आता राज्यपाल आणि राज्य सरकार परस्परांपुढे उभे ठाकले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही, असा पेच विद्यार्थ्यांपुढे आहे. राज्य सरकारने सरसकट परीक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला. विद्यापीठ कायद्यात राज्यपाल तथा कुलपती सर्वोच्च असतानाही त्यांना विश्वासात न घेत सरकारने परस्पर निर्णय घेतल्याने राज्यातील शिक्षण वर्तुळात नवीन वाद निर्माण झाला आहे. अशात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठासाठी विद्यापीठनिहाय धोरण तयार करावे, अशी मागणी पुढे आली आहे.

परीक्षा रद्द करणे तोडगा नाही

कोणत्याही पद्धतीने परीक्षा न घेता उत्तीर्ण करणे हे कोणत्याही समस्येचे उत्तर नाही. परीक्षेचे पावित्र्य जपायला हवे. आजची परिस्थीती वेगळी आहे. ती कायमस्वरूपी नाही. त्यामुळे या समस्येवर वेगळ्या पद्धतीने उत्तर शोधावे लागणार आहे. राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची परिस्थिती वेगवेगळी आहे. तेथील अभ्यासक्रम, नियम, परिनियम, भौगोलिक परिस्थिती, परीक्षा पद्धतीही वेगळी आहे. काही विद्यापीठांमध्ये कॉलेजस्तरावर परीक्षा होते. काही विद्यापीठे सगळ्याच परीक्षा घेतात. त्यामुळे विद्यापीठनिहाय धोरण आखणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाबाबत बोलायचे झाल्यास येथील चार जिल्ह्यात करोनाचा प्रकोप नाही. त्यामुळे तेथील परिस्थितीचा विचार करायला हवा. विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी याच चार जिल्ह्यांतील आहेत. २० टक्के राज्यातील अथवा राज्याबाहेरील आहेत. त्या बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे वेगळे पर्याय निवडता येतात. त्यामुळे राज्यात जिल्हानिहाय करोनाची स्थिती काय, सुरक्षित वावर आणि आरोग्याची काळजी घेत परीक्षा घेता येईल काय, या पर्यायाचा विचार करण्याची गरज आहे. विद्यापीठांच्या विविध प्राधिकारिणींनाही विश्वासात घेतले जाणे गरजेचे आहे. आज परीक्षा न घेता पदवी देण्याचा निर्णय कायद्यात बसवावा लागणार आहे. त्यासाठी अनेक नियमांत दुरूस्ती करावी लागेल. पदवीदान समारंभात पदके व पारितोषिके सरासरी गुणांवर देता येतील काय, याचाही विचार करावा लागेल. खासगी विद्यापीठांनी परीक्षा घेतली व राज्यातील विद्यापीठांनी त्याच कोर्सची परीक्षा घेतली नाही तर काय स्थीती होईल, त्याचाही विचार करावा.

– विनायक देशपांडे, माजी प्रभारी कुलगुरू

अंतिम सत्राच्या परीक्षा हिवाळ्यात घ्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत घेतलेला निर्णय हा नियमित विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. करोनामुळे संकट निर्माण झाले असले तरीही त्यावर मात करण्यासारखी स्थिती आहे. राज्यातील प्रत्येकच भागात करोनाचे रूग्ण नाहीत. सुरक्षित वावर आणि आरोग्याची काळजी घेतल्यास परीक्षा घेता येणार आहेत. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या हातात पदवी दिल्यास त्या पदवींना किती किंमत राहिल त्याचा विचार राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. हा मुद्दा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांवर सोपवायला हवा होता. त्यात राजकीय नेतृत्वाने हस्तक्षेप करणे गरजेचे नव्हते. प्रत्येक विद्यपीठाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे एकाच फुटपट्टीने सगळ्यांना मोजणेही अयोग्य आहे. सध्या परीक्षा घेता येत नसल्या तरीही त्या परीक्षा हिवाळ्यात घेता येऊ शकतात. काही विद्यापीठांनी तशी तयारीही केली होती. तेव्हा राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य टिकवायचे असेल तर परीक्षा घेण्याचा निर्णय घ्यावा.

– वसंत चुटे, सिनेट सदस्य, रातुम नागपूर विद्यापीठ

विद्यार्थ्यांचा विचार करावा

पदवी व पदव्युत्तरच्या कोणत्याच परीक्षा होणार नसल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरबाबत गंभीर समस्या निर्माण होणार आहे. राज्यातील विद्यापीठांनी परीक्षेची तयारी केली होती. अशात सरकारच्या निर्णयाने विद्यापीठांचेही अवसान गळाले आहे. वास्तविकता विद्यापीठांचे प्रमुख म्हणून कुलपतींना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. परंतु राज्य सरकारने परस्पर निर्णय जाहीर करून कायद्याचे उल्लंघन केले आहे. कुलपतींना विश्वासात न घेता अशाप्रकारे निर्णय घेतल्याने त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात प्रत्येक प्राधिकारिणींची भूमिका व अधिकार नमूद आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना खुष करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्याला कायदेशीर आधार नाही.

– दिनेश शेराम, व्यवस्थापन परिषद सदस्य रातुम नागपूर विद्यापीठSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Cyber Attack in UK Offensive Photo Of Female Athlete Made Viral – खळबळजनक; सायबर हल्ला, महिला खेळाडूचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ केले व्हायरल

नवी दिल्ली: जगभरात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. सर्व सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांची सोशल मीडिया खाती आणि संगणक हॅकर्सकडून हॅक केले...

Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Gets Bail in Drug Case NCB – अमली पदार्थ प्रकरणात भारती आणि हर्ष यांना दिलासा; जामीन मंजूर

मुंबई: अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेली कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना रविवारी सुटीकालीन न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली...

Recent Comments