Home शहरं नागपूर Nagpur News: विद्यार्थ्यांना परत आणणार - will bring students back

Nagpur News: विद्यार्थ्यांना परत आणणार – will bring students back


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

राजस्थानच्या कोटासह अन्य भागात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सक्रिय झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात परत येण्यासाठी प्रयत्न सुरू होता. परत येण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना आता प्रतिसाद मिळाला आहे. कोटा येथे अडकलेल्या १ हजार ८०० विद्यार्थ्यांना येत्या तीन दिवसांत महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारची आवश्यक ती सर्व परवानगी घेण्यात येणार असल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी संपर्क साधला. आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार व राजस्थानमधील काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यांनीही आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सतत काम करणे सुरू केले आहे.

महाराष्ट्रातून राजस्थानातील कोटा येथे शिक्षणासाठी गेलेले सुमारे १ हजार ८०० विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकले आहेत. राजस्थानातील विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून या अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली. त्यानंतर राजस्थान सरकारला याबाबत पत्र लिहिण्यात आले. महाराष्ट्र आणि राजस्थान सरकार केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व परावनगी रितसर घेणार आहे. येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याचे काम सुरू होईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. ‘राज्यातील सर्व विद्यार्थी ३ मेपूर्वी परत येतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची काळजी राज्य सरकार घेत आहे. त्यामुळे पालकांनी चिंता करू नये’, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले.

अन्य विद्यार्थ्यांनाही मदत

काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनीदेखील अन्य राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती मागविली आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, बिहार आदी राज्यातील विद्यार्थी परत पाठविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची यादी मागविण्यात आली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी याबात चर्चा सुरू आहे. दोन्ही राज्यातील सरकार मिळून विद्यार्थ्यांना तातडीने आपापल्या राज्यांत परत पाठविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे अविनाश पांडे यांनी सांगितले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

children engage in mobile games: व्हर्च्युअल खेळांमध्ये अडकतेय बालपण – most of children are engage their time in virtual games

म. टा. प्रतिनिधी, नाशिकशालेय वयोगटातील मुला-मुलींच्या हाती मोबाइल देण्याचे पालक टाळत आले असले तरी, यावर्षी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल विद्यार्थ्यांच्या हातात द्यावाच लागत आहे....

chatting on whatsapp: ऑफलाइन राहून Whatsapp वर करा चॅटिंग, कुणालाच दिसणार नाही ऑनलाइन – amazing trick of chatting on whatsapp while offline, no one...

नवी दिल्लीः Whatsapp वर खूप सारे फीचर्स मिळत आहेत. परंतु, एका फीचरची उत्सूकता संपत नाही. जर तुम्हाला उशीरा रात्री पर्यंत चॅटिंग करण्याची सवय...

chandrakant patil: Chandrakant Patil: ‘चंद्रकांत पाटील नावाची गोळी… विरोधकांना ‘हा’ डोस घ्यावाच लागतो!’ – chandrakant patil targets shiv sena and maha vikas aghadi

पंढरपूर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीवर हल्ले...

Recent Comments