Home शहरं नागपूर Nagpur News : वेणुवन हाऊसिंग सोसायटी सील - venuvan housing society seal

Nagpur News : वेणुवन हाऊसिंग सोसायटी सील – venuvan housing society seal


म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

धंतोली झोनमधील प्रभाग क्र. ३५ या नरेंद्रनगर भागातील वेणुवन हाऊसिंग सोसायटी रविवारी सील करण्यात आली. या भागात एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याशिवाय उत्तर नागपुरातील हबीबनगर भागातही करोनाचा रुग्ण आढळल्याने परिसर सील करण्यात केला. या भागातील सहा जणांना पाचपावली पोलिस क्वॉर्टर तर, नरेंद्रनरातील १८ जणांना रवीनगर येथे विलगीकरणात ठेवण्यात आले.

दक्षिण पश्चिमेस प्लॉट नं. ५२, प्रीती एस जवादे यांचे घर, दक्षिणेस प्लॉट नं. १२, नरेश बहादुरे यांचे घर, उत्तर पूर्वेस प्लॉट नं. ०१ धुनी कन्स्ट्रक्शन, विजय किराणा स्टोअर्स, प्लॉट नं. २१ निनावे यांचे घर तसेच, उत्तर पश्चिमेस प्लॉट नं. २५ कपिल रामटेके यांचे घर आदी परिसर सील करण्यात आला.

आसीनगर झोनमधील हबीबनगर हा परिसरही चहुबाजूंनी सील केला. यात उत्तरपश्चिमेस विकास मेडिकल स्टोअर्स, उत्तर पूर्वेस बाबा बुध्दाजीनगर गुरुद्वारा, दक्षिण पूर्वेस केजीएन बिल्डींग तर, दक्षिण पश्चिमेस सिध्दार्थनगर प्रवेशद्वारपर्यतचा परिसर सील करण्यात आला.

या दोन्ही क्षेत्रांत जीवनावश्यक वस्तूंचा सेवापुरवठा करणारे व्यक्ती(पासधारक), जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित सेवा, वैद्यकीय सेवा संबंधीत खासगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजी,रुग्णवाहिका, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी याशिवाय शासकिय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांना प्रतिबंध असणार नाही.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

President Ramnath Kovind: president speech on republic day : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन… – president ramnath kovind speech on republic day live...

नवी दिल्लीः देश उद्या आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. करोना संकटाच्या स्थितीत आणि चीन, पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती देशाला...

dhananjay desai on aurangabad name change: Dhananjay Desai: ‘औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करणे म्हणजे शुद्धीकरण!’ – changing aurangabad to sambhajinagar means purification says dhananjay desai

नगर: 'औरंगाबाद' या शहराचे नाव 'संभाजीनगर' करणे गरजेचे आहे. हे नामांतर नसेल तर एकप्रकारे शुद्धीकरण असेल,' असे स्पष्ट मत हिंदू राष्ट्र सेना प्रमुख...

man attempt to burn his wife in aurangabad: विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न – aurangabad crime news, man attempt to burn his wife after she refuses...

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगरवाळूज जवळील कमळापूर येथे एका विवाहितेला माहेरून कार घेण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी करत पतीने मारहाण करून रॉकेल टाकून...

Recent Comments