Home शहरं नागपूर Nagpur News : शहर तापले; पारा ४४ पार - the city heated...

Nagpur News : शहर तापले; पारा ४४ पार – the city heated up; mercury 44 cross


म.टा. प्रतिनिधी, नागपूर

गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसामुळे शहरातील तसेच विदर्भातील तापमान घसरले होते. यंदा उन्हाळ्याचा ‘फील’च येत नसल्याची भावना विदर्भावासी व्यक्त करीत असतानाच मेच्या सुरुवातीला विदर्भात उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची जाणीव झाली. रविवारी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.९ अंश तर नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

यंदा एप्रिल महिन्यातही विदर्भाला वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ज्या काळात विदर्भात पारा ४५ अंशांच्या आसपास पोहोचलेला असतो त्या काळात यंदा पारा ४०च्या आसपासच होता. सातत्याने तयार होणारे ढगाळ वातावरण आणि परिणामतः होणारा पाऊस यामुळे अद्याप उन्हाची भट्टी जमलीच नव्हती. परंतु, शनिवारपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. अकोल्यात सर्वाधिक ४४.९ तर त्याखालोखाल नागपुरात ४४.२ आणि ब्रह्मपुरी येथे ४४.१ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर आणि अमरावती येथेही प्रत्येकी ४३.८ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भात बुलडाणा येथे सगळ्यात कमी ४१.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात किमान तापमानही २८. ३ अंश इतके होते.

उद्या पाऊस!

मंगळवारपर्यंत अकोला, अमरावती व नागपूर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, मंगळवारी भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे उष्णतेच्या लाटेसोबतच परत एकदा वादळी पावसाचीही शक्यता आहे. मंगळवारी शहरात ४५ च्या आसपास तापमान राहणार असले तरी वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील आठवड्यात शहरात पारा ४६ अंशांपर्यंतही जाऊ शकतो अशीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पोलिसांचा कडा पहारा

करोनामुळे घोषित करण्यात आलेले लॉकडाउन योग्यरीत्या पाळले जावे, याची जबाबदारी पोलिस दलावर आहे. आज शहरात ४४ अंशांहून अधिक पारा असताना पोलिस अधिकारी व कर्मचारी उन्हाच्या चटक्यांमध्येही बंदोबस्तासाठी रस्त्यांवर उभे होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

yeola st depot employees: एसटीचे कर्मचारी पुन्हा करोना बाधित – nashik corona update : 3 yeola st depot employees found corona positive

म. टा. वृत्तसेवा, येवलाएकीकडे येवला तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असताना, दुसरीकडे मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी आपले कर्तव्य बजावून परतलेल्या एसटीच्या येवला...

Bank employees strike: संपामुळे सातशे कोटींचे व्यवहार ठप्प – 700 crore transactions stalled due to strike

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकेंद्र सरकार बँकांचेही खासगीकरण करू पाहत आहे. पीएमसी, एस बँकेच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आता तेच लक्ष्मी विलास बँकेचे होऊ पाहत...

Recent Comments