Home शहरं नागपूर Nagpur News : शहर बंद; जिल्हा खुला - city closed; district open

Nagpur News : शहर बंद; जिल्हा खुला – city closed; district open


आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती; राज्यशासनाने जारी केलेल्या निर्देशांवरून मात्र संभ्रम

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

मुंबई, पुणे वगळता इतर भागांत जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचीही एकल (स्टॅण्ड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. मात्र, नागपूर शहरात कुठलीही शिथीलता नाही. शहर रेड झोनमध्ये असल्याने ज्या सवलती यापूर्वी सुरू होत्या, त्या यानंतरही कायम राहणार असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात मात्र एकल दुकाने सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल दुकाने सुरू करण्याची सवलत देताना, ती कंटेन्मेंट झोनमध्ये नसतील, अशी अट आहे. यात मद्याच्या दुकानांना हाच नियम लागू असेल. एकल दुकाने याचा अर्थ, ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने, असा असेल. कोणते दुकान एकल आहे की नाही, याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील, असे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवे आदेश रविवारी जारी केले. या आदेशानुसार मुंबई, पुण्यासाठी जे नियम लागू असतील, तेच नागपूर शहरासाठीही लागू राहतील, असे स्पष्ट केले.

दरम्यान, शहरात कुठलीही शिथिलता मिळणार नसल्याचे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले असले तरी, राज्यशासनाने यासंदर्भात जारी केलेल्या निर्देशांवरून संभ्रम कायम आहे.

शहरातील स्थिती

– सरकारी आस्थापना अथवा खासगी कार्यालयांना ३० टक्के कर्मचारी संख्या ठेवून कार्य सुरू करण्यास नागपुरात पुढील आदेशापर्यंत बंदी कायम राहील.

– वाइन शॉप किंवा अन्य कुठलीही दुकाने शहर हद्दीत सुरू होणार नाहीत.

– करोना रुग्णांचा आकडा दीडशेपार झाल्याने आगामी १७ मेपर्यंत लॉकडाउन आणखी कडक राहणार.

– लग्नकार्यात ५० जण तर, अंत्यसंस्कारात आता २० जणांना सहभागी होता येईल.

– शहरातील कुठलेही उद्योग सुरू होणार नाहीत.

-जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. मात्र, बांधकामांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. यात बांधकामाच्या ठिकाणीच मजुरांच्या निवासाची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ग्रामीणमध्ये असे असेल चित्र

– कंटेन्मेंट झोनमध्ये नसलेल्या भागात जीवनावस्यक वस्तूंसह इतर वस्तूंची एकल दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.

– ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाचपेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने सुरू करता येणार.

– कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार.

– शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील.

– या पाच दुकानांमध्ये मद्यविक्रीच्या दुकानाचा समावेश आहे. मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त दुकाने नको.

– ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे यांसारख्या इतर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

– मर्यादित प्रमाणात उद्योग सुरू करण्याची तसेच बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली.

– बांधकाम कामगारांसाठी कामाच्या ठिकाणीच राहण्याची व्यवस्था करणे बंधनकारक आहे.

– ई कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

covid 19 vaccine: करोना लसः रजिस्ट्रेशन करताना ‘या’ चुका करू नका – covid 19 vaccine online 5 things to be careful about while registering

हायलाइट्स:करोना लस देशात उपलब्ध असून ती अनेकांनी घेतली आहे लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे या लस संबंधी कोणीही काहीही मागितले तर त्यावर...

Kunkeshwar Fair: करोनाचा धसका! श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं साजरी होणार – sindhudurg: kunkeshwar fair of devgad cancelled due to coronavirus

हायलाइट्स:राज्यात करोनानं पुन्हा खाल्ली उचलधार्मिक कार्यक्रम, यात्रांवर निर्बंधकोकणातील श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्राही रद्दसुरेश कौलगेकर । सिंधुदुर्गदक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र...

Religious Freedom Act: Love Jihad : मध्य प्रदेश विधानसभेत ‘लव्ह जिहाद’विरोधात ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर – mp religious freedom act aims to penalize love jihad...

हायलाइट्स:याआधी, धर्मस्वातंत्र्य अध्यादेशाला राज्यपालांनी दिली होती मंजुरी'लव्ह जिहाद' विरोधात कडक शिक्षेची तरतूद१-१० वर्षांची कैद आणि १ लाखांपर्यंतच्या आर्थिक दंडाची तरतूदभोपाळ : मध्य प्रदेशात...

Recent Comments