Home शहरं नागपूर Nagpur News : शिक्षण विभाग नाही ’जमिनीवर’! - education department not 'on...

Nagpur News : शिक्षण विभाग नाही ’जमिनीवर’! – education department not ‘on the ground’!


शिक्षक संघटनांची शासनाच्या धोरणांवर टीका

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे अधिकारी हे प्रत्यक्ष परिस्थितीबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे, लॉकडाउन काळात ऑनलाइन शिक्षण राबविण्यासाठी वस्तुस्थितीची जाणीव न ठेवता निर्णय घेण्यात येत असल्याची टीका शिक्षक संघटनांनी केली आहे.

लॉकडाउन काळात शाळांना सुटी देण्यात आल्याने सर्व वार्षिक परीक्षा रद्द करण्यात आल्या. पहिली ते आठवी आणि नववी ते अकरावी या वर्गांचे निकाल जाहीर केले जावे, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. मात्र, संचारबंदीच्या काळात शिक्षकांना शाळांमध्ये जाणे शक्य नाही. अशा परिस्थितीत निकाल जाहीर कसा करावा, याचा विचार शिक्षण विभागाने केलेला नाही. शाळेत जाण्यासाठी शिक्षकांना पोलिस परवानगी कशी मिळणार या बाबीकडेही लक्ष देण्यात आलेले नाही. पुढील शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू होण्याचे सध्या तरी चित्र दिसत नसताना व याबाबत शिक्षण विभागातच संभ्रम असतांना वार्षिक निकाल लावण्याची घाई शिक्षण विभाग का करीत आहे, असा सवाल शिक्षकांनी केला आहे.

शाळा बंद असताना आणि मे महिन्यात तशीही सुटी असताना ऑ्नलाइन शैक्षणिक वर्गांचा आग्रह धरण्यात येतो आहे. ग्रामीण भागात असलेल्या सोयीसुविधांचा अभाव विचारात न घेता डिजिटल शिक्षणाचा आग्रह धरण्यात येत असल्याची टीकाही शिक्षकांनी केली आहे. २०१९-२० च्या संच-मान्यतेसाठी विद्यार्थी आधार नोंदणी, वार्षिक निकाल घोषित करून विद्यार्थ्यांना कळविणे, पुढील सत्रासाठी विद्यार्थी प्रवेश नोंदविणे अशा सूचनांचे पालन सध्याच्या परिस्थितीत कठीण झाले आहे. आलेल्या अनपेक्षित संकटातून राज्याची परिस्थिती निवळण्याची वाट बघितली जावी. योग्य नियोजनाद्वारे ‘सम व विषम’ पद्धतीचा अवलंब केला जावा आणि आरोग्यविषयक पूरक साधनांचा वापर करीत शाळाचे वार्षिक नियोजन ठरवणे आवश्यक आहे. शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस तुर्तास स्थगिती दिली जावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनचे पदाधिकारी महेश जोशी, हरीश बुरंगे, शरद भांडारकर यांनी केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cctv cameras in aurangabad: कृत्रीम बुद्धीमत्तेचे वरदान – 700 cctv cameras is being installed in the aurangabad city

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकृत्रीम बुद्धीमत्ता या सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी केला जात आहे. आता हे तंत्रज्ञान औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालय...

Ram Mandir Donation: ‘मुस्लिमांनीही राम मंदिराकरता निधी उभारण्यासाठी पुढे यायला हवं’ – ram mandir donation taslima nasreen appeal muslims come forward to raise money

कोलकाताः आंतरराष्ट्रीय लेखिका आणि मूळच्या बांगलादेशच्या असलेल्या तस्लिमा नसरीन ( taslima nasreen ) या आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता अयोध्येतील राम मंदिर...

woman locked in cage: पाच वर्षांपासून ‘ती’ पिंजऱ्यात राहतेय; कारण ऐकाल तर धक्का बसेल! – philippines mentally ill woman locked in cage by family

मनिला: फिलीपाइन्समध्ये एक तरुणी मागील पाच वर्षापासून पिंजऱ्यात कैद आहे. तिच्या कुटुंबीयांनीच तिला या पिंजऱ्यात कैद केले आहे. वर्ष २०१४ पर्यंत एका सामान्य...

Recent Comments