Home शहरं नागपूर Nagpur News : संत्र्यासाठी झटणारे सुनील शिंदे निवर्तले - sunil shinde, who...

Nagpur News : संत्र्यासाठी झटणारे सुनील शिंदे निवर्तले – sunil shinde, who was fighting for oranges, passed away


म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

संत्र्याला राजाश्रय मिळावा, यासाठी संघर्ष करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुनील शिंदे यांचे गुरुवारी पहाटे खासगी इस्पितळात आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, पुत्र अविनाश, सतीश व संदेश आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यसंस्कार आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या गावी, सावरगाव येथे होतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू असलेल्या शिंदे यांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघातून १९८५ व १९९० असे दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले. राज्यात पहिल्यांदा आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांची म्हाडाच्या सभापतिपदी नियुक्ती करण्यात आली. मराठा विद्या प्रसारक समाजाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. शिंदे यांनी १९९० साली शिक्षणसंस्थेची स्थापना करून काटोल व नरखेड तालुक्यात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. सावरगाव ग्रामपंचायतीत त्यांची अनेक वर्षे सत्ता होती. डोंगरगाव येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. संत्राप्रक्रिया प्रकल्प त्यांच्या पुढाकाराने सुरू झाला. हा कारखाना नंतर बंद पडल्याने परत सुरू व्हावा व संत्री उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी अखेरपर्यंत आवाज उठवला.

सोनूबाबा संत्रेवाले

राजकीय व कार्यकर्त्यांच्या वर्तुळात सोनूबाबा म्हणून लोकप्रिय असणारे सुनील शिंदे यांचा हिवाळी अधिवेशन काळात विधानभवन परिसरात संत्र्यांचा ज्युस हादेखील तितकाच लोकप्रिय होता. संत्री उत्पादकांच्या मागण्यांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे परिसरात ज्युसचे वाटप केले. ‘मटा’च्या ‘मिशन ऑरेंजसिटी’मध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. या उपक्रमाचे त्यांनी अंत:करणपूर्वक अभिनंदन केले होते. नुसते घरी संत्र्याची झाडे लावून चालणार नाही तर संत्राप्रक्रिया उद्योगासाठी सर्वांनी आग्रही असावे, असे त्यांचे मत होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

deepak maratkar murder: Pune: युवा सेना नेते दीपक मारटकर हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का – pune shiv sena youth wing leader deepak maratkar murder...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर हत्या प्रकरणातील (Deepak Maratkar murder case) सर्व आरोपींवर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली...

Election Commission: ‘निवडणूक प्रचार सभेत मास्क घाला, शारीरिक अंतर पाळा’; निवडणूक आयोगाने खडसावले – bihar assembly election 2020 election commission writes letter to all...

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना आणि सरचिटणीसांना पत्र लिहिले आहे. देशात सुरू असलेला...

sex with chicken: विकृतीचा कहर! कोंबड्यांसोबत करायचा सेक्स, पत्नी काढायची व्हिडिओ – 37 years old perverted person jailed three years for having sex with...

लंडन: लैंगिक वासना शमण्यासाठी विविध मार्गांचा वापर काहीजण करत असतात. मात्र, काहीजण विकृत आणि किळसवाणा मार्गाचा अवलंब करतात. असाच एक प्रकार समोर आला...

Recent Comments