Home शहरं नागपूर Nagpur News: साखळी वाढली तीनने; संख्या १०७वर - the chain grew by...

Nagpur News: साखळी वाढली तीनने; संख्या १०७वर – the chain grew by three; at number 107


उपराजधानीची चिंता कायम

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

सात दिवसांपासून सातत्याने करोनाचे संक्रमण सुरू असलेल्या उपराजधानीसाठी शनिवारचा दिवसही चिंता वाढविणारा ठरला. करोना प्रादुर्भावाच्या साखळीत गेल्या २४ तासांत तीन नवे रुग्ण जोडले गेल्याने बाधितांचा आकडा आता १०७वर पोहोचला आहे.

शहरात ५२वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाल्याचे शनिवारी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने तपासलेल्या नमुन्यांमधून स्पष्ट झाले. तर दुसरा २४वर्षीय पुरुषही करोनाच्या चाचणीत दोषी आढळला. हे दोघेही सतरंजीपुरा येथील रहिवासी असून, काही दिवसांपूर्वी दगावलेल्या बाधित रुग्णाच्या नातेवाइकांच्या सहवासात आले होते. याखेरीज शनिवारी एम्सच्या विषाणू प्रयोगशाळेने तपासलेल्या आणखी एकाच्या घशातील स्रावांच्या नमुन्यांमध्ये करोनाचा अंश आढळला. हा ४०वर्षीय पुरुष मोमिनपुरा येथील रहिवासी आहे. या तीन नव्या रुग्णांची भर पडल्याने नागपुरातील करोनाबाधितांचा आकडा आता १०७वर पोहोचला आहे.

आणखी पाचजणांनी केली मात

या घडामोडीत सतरंजीपुरा येथील ज्या रुग्णाच्या सहवासात आल्याने पाच जणांना लागण झाली होती, त्यांनी करोनावर यशस्वी मात केली. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनाचा शहरात शिरकाव झाल्यापासून या आजारावर मात करणाऱ्यांची संख्याही आता २२वर गेली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Maharashtra minister: धान खरेदी केंद्र वाढवा – maharashtra minister chhagan bhujbal has directed increase number of grain shopping centre to administration

म. टा. प्रतिनिधी, मुंबई विदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली....

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

father and son found dead in apegaon paithan: बिबट्या जाळ्यात येईना; तीन जिल्ह्यात दहशत – father and son found dead in apegaon paithan due...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादबिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यातील आपेगाव शिवारात घडल्यानंतर या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पैठण परिसरातील...

Recent Comments