Home शहरं नागपूर Nagpur News : सावधान... चक्रीवादळ घोंगावते आहे! - beware ... the hurricane...

Nagpur News : सावधान… चक्रीवादळ घोंगावते आहे! – beware … the hurricane is roaring!


‘निसर्ग’ दुपारी अलिबागजवळ धडकणार

रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गला इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३०च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचविल्याप्रमाणे ‘निसर्ग’ असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज, बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने ‘निसर्ग’ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले. चक्रीवादळामुळे रायगडसह मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गलाही इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय चक्रीवादळाच्या पट्ट्यामध्ये उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भाग येण्याचा अंदाज आहे. बलसाड, नवसारी, डांग, दमण, दादरा नगर हवेली, सुरत या गुजरातमधील जिल्ह्यांनाही ‘निसर्ग’चा फटका बसू शकेल.

‘निसर्ग’च्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील गावांमधून, कच्च्या घरांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. मात्र, महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नसल्याने चक्रीवादळ आले तर काय करायचे, काय तयारी हवी, त्याची तीव्रता किती असेल या सगळ्याबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाचे आणि अनभिज्ञतेचे वातावरण दिसले. चक्रीवादळाबद्दल सरकारी आणि प्रशासकीय पातळीवरून संदेश प्रसारित होणे सोमवारी रात्री सुरू झाल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे. चक्रीवादळाचा मार्ग, त्यानुसार पूर्वेकडील राज्यांमध्ये घेतली जाणारी काळजी पाहता महाराष्ट्रासंदर्भात मात्र इतक्या उशिरा का जाग आली, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

‘निसर्ग’ची तीव्रता ‘अम्फन’इतकी नसेल असाही दिलासा देण्यात येत आहे. चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर साधारण चार तासांपर्यंत त्याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज आहे. या काळामध्ये झोपड्या, कच्ची घरे यांना सर्वाधिक धोका आहे. या घरांचे छप्पर उडून जाऊ शकते, घरांवर टाकलेले पत्रेही उडून जाऊ शकतात. वीजपुरवठा, संवादाच्या सेवा खंडीत होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. कच्च्या रस्त्यांवर परिणाम होऊ शकतो. झाडांच्या फांद्या पडणे, झाडे पडणे, केळी, पपई अशी झाडे उन्मळून पडू शकतात. किनारपट्टीवरील पिकांना चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. मिठागरांनाही चक्रीवादळामुळे संभाव्य धोका आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस

रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर येथे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याचसोबत पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथेही पाऊस पडेल. बुधवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर मुंबईतील आकाश ढगाळ होते. क्वचित काही ठिकाणी रिमझिम ते मध्यम सरी कोसळल्या. चक्रीवादळामुळे लाटा नेहमीच्या उंचीपेक्षा एक ते दोन मीटर अधिक उंच उसळतील. बुधवारी सकाळी १० आणि रात्री दहाच्या सुमारास अनुक्रमे ४.२६ आणि ४.०६ मीटर उंचीच्या लाटा मुंबईमध्ये उसळण्याची शक्यता आहे. तर ४ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास ४.५६ मीटर इतकी लाटांची उंची असेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

MNS Morcha against Electricity Bills: MNS Morcha Against Inflated Electricity Bill Live Updates – MNS Morcha Live: मनसेचा झटका मोर्चा; राज्यभरात कार्यकर्ते रस्त्यावर

सर्वसामान्य नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलांच्या विरोधात मनसेनं आज मोर्चाचं आयोजन केलं आहे. अनेक शहरांत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्ते रस्त्यावर...

ed inquiry in private firm in nashik: नाशिकच्या दोन संस्थाची ‘ईडी’कडून चौकशी – enforcement directorate investigation in cooperative organization and private firm over economic...

आर्थिक गैरव्यवहार व व्यवहारांमधील अनियमितता प्रकरणांत मातब्बरांना घाम फोडणाऱ्या 'ईडी'चे (enforcement directorate ) पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे.  Source link

Recent Comments