Home शहरं नागपूर Nagpur News : सेवाग्राम आश्रमात विद्रोह - rebellion at sevagram ashram

Nagpur News : सेवाग्राम आश्रमात विद्रोह – rebellion at sevagram ashram


– अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू यांचा राजीनामा

-गांधीवाद्यांमध्ये खळबळ

म. टा. वृत्तसेवा, वर्धा :

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी अध्यक्षपदाचा शनिवारी रात्री तडकाफडखी राजीनामा दिल्याने गांधीवाद्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रभू यांनी न्यायालयात जाण्याचा देखील इशारा दिला आहे. सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही आणि प्रभू यांच्यात असलेल्या वादामुळेच हे राजीनामा नाट्य घडल्याची चर्चा आहे. या राजीनामा नाट्याचे गूढ २०१८मध्ये सेवाग्राम येथे झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत असल्याचेही समोर आले आहे.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगात शांततेचा संदेश देणाऱ्या गांधीवाद्यांमध्येच सध्या वातावरण अशांत असल्याचे दिसून येत आहे. गांधी जन्मशताब्दी निमित्ताने वर्षभर सर्वत्र कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. तर दुसरीकडे सेवाग्राम आश्रम परिसरात सेवाग्राम विकास आराखड्यात विकासकामाचा धडाकाच लावण्यात आला होता. सिमेंट काँक्रिटचे काम आश्रम परिसरात होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत होती. पण अलीकडच्या काळात परिसरात सिमेंटीकरण वाढले होते. त्यामुळे आश्रम प्रतिष्ठान आणि सर्व सेवा संघ यांच्यात खटके उडायला लागले होते. पण २०१८ मध्ये ठरलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला सेवाग्राम आश्रमाच्या शांती निवासाची जागाच नाकारण्यात आली होती. तेव्हापासून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही आणि सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांच्यात वाद वाढू लागले होते. अखेर मार्च महिन्याच्या अखेरीस विद्रोही यांचा कार्यकाळ संपण्याच्या आधी त्यांनी १८मार्चला प्रभू यांना पत्र देऊन पदावरून पायउतार होण्याचे फर्मान सोडले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cold storage project in aurangabad: ‘कोल्ड स्टोअरेज’ला मुहूर्त मिळेना – work on the aurangabad cold storage proposal has not started even after 8 months

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रस्तावित 'कोल्ड स्टोअरेज'च्या कामास आठ महिन्यांनंतरही मुहूर्त लागला नाही. संबंधित कंपनीने 'लिज प्रीमियम'पोटी...

second side of farm loan waiver: कर्जमाफीची दुखरी बाजू – devidas tuljapurkar article on second side of farm loan waiver

देविदास तुळजापूरकरकृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटत असताना, याच घटकांशी संबंधित; परंतु सर्वस्वी वेगळ्या आणि सर्वार्थाने देशव्यापी अशा एका प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा...

sushant singh rajput latest news: Sushant Singh Rajput: ‘भाजप सुशांतसिंहच्या आत्म्याला मोक्ष मिळू देत नाही’ – bjp does not allow sushant singhs soul to...

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचा राजकीय उपयोग करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने अद्यापही त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळू दिली नाही, असे म्हणत महाराष्ट्र प्रदेश...

Recent Comments