Home शहरं नागपूर Nagpur News : हमीभाव निव्वळ धुळफेक - guaranteed net dusting

Nagpur News : हमीभाव निव्वळ धुळफेक – guaranteed net dusting


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

केंद्र सरकारने यंदा ३ ते ९-१० टक्के हमीभाव वाढवून निव्वळ धुळफेक केली आहे. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जगातून कोणताही शेतमाल हमी पेक्षा कमी भावात आयात होणार नाही, वायदे बाजार आणि गावांमध्ये व्यापाऱ्यांकडून थेट खरेदीतही भावाचे संरक्षण करण्याची घोषणा सरकारने करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांनी केली.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावावर जावंधिया यांनी टीका करत तीव्र नाराजी व्यक्त केली. नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे सरकारने हमीभाव जाहीर केले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर ५० ते ८० टक्के भाव वाढवून दिले, असे सांगितल्याने लोकांमध्ये गैरसमज होतो. वस्तुस्थिती तशी नाही. यंदा ३ ते १० टक्के भाव वाढवले. गेल्यावेळी कमी भाव वाढवल्याने त्यात थोडी वाढ केली. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी ५० टक्के नफा जोडून भाव देऊ, असे जाहीर केले पण, दिले नाही, असेही ते म्हणाले.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची योग्य अंमबजावणी अद्याप केलेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून हेच चालले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती भाव वाढवले, हे सरकारने लक्षात घ्यावे. कापसाचे भाव ५ हजार ५५० रुपयांवरून ५ हजार ८२५ रुपये क्विंटल केले. तुरीचे भाव ५ हजार ८०० रुपयांवरून ६ हजार रुपये केले. धान, तूर, हरभरा, मका यापैकी आजही शेतकऱ्यांच्या कुठल्याच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. खरेदी केंद्र नाही. कमी भावात शेतमाल विकावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआयआयच्या चर्चेदरम्यान बाजार समिती, जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करण्याचे सुतोवाच केले. कायदे रद्द करून बाजारात भाव कसा मिळणार, असा सवालही त्यांनी केला.

जागतिक बाजारपेठेतील स्थितीनुसार कापसाला साडेचार हजार रुपयांच्यावर भाव देऊ शकत नाही, अशी स्थिती बाजारपेठेतील स्थिती आहे. देशाची अर्थव्यवस्था अब्जावधीची करताना शेतमालाचे हमीभाव दुप्पट होतील का, याचे उत्तर पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये द्यावे, असेही विजय जावंधिया म्हणाले.

…….Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : …अन् यशवंतराव चव्हाण नाशिकमध्ये पायी फिरले! – when yashwantrao chavan visited nashik in 1965

'हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री' असे ज्यांचे वर्णन केले जाते ते देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण नाशिकमधून चक्क पायी फिरले होते! देशाच्या संरक्षणाची धुरा आपल्या...

Rohit Sharma: India vs Australia : रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी होणार तरी कधी, जाणून घ्या तारीख.. – india vs australia : rohit sharma’s...

मुंबई : सध्याच्या घडीला सर्वांचेच लक्ष रोहित शर्माच्य फिटनेस टेस्टकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत रोहित ही टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या...

bollywood news News : इतकंच असेल त्यानं माझं नाव लावू नये; जानच्या आरोपांमुळे कुमार सानू नाराज – kumar sanu suggests son jaan kumar sanu...

मुंबई: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान सानू यानं वडिल कुमार सानू यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी वडिल म्हणून माझी कोणतीही जबाबदारी पार...

hyderabad municipal elections 2020: शिवसेनेला अॅलर्ट? हैदराबाद महापालिका निडणुकीसाठी भाजपची फौज, PM मोदीही प्रचारात उतरणार! – amit shah jp nadda to campaign for hyderabad...

हैदराबाद: हैदराबादमध्ये ( hyderabad election ) यावेळी काहीतरी 'अनपेक्षित' पाहायला मिळू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( pm modi ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा...

Recent Comments