Home शहरं नागपूर Nagpur News : हुकली पाणवठ्यावरील प्राणिगणना - census of the hukli watershed

Nagpur News : हुकली पाणवठ्यावरील प्राणिगणना – census of the hukli watershed


बुद्धपौर्णिमेला होते आयोजन : यंदा पहिल्यांदाच बसला करोना लॉकडाउनचा फटका

म.टा.प्रतिनिधी, नागपूर

वन्यजीवप्रेमींमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली पाणवठ्यावरील प्राणिगणना यंदाच्या वर्षी होणार नाही. अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेल्या मचाणावरील प्राणिगणनेला यावर्षी करोनाचा फटका बसला आहे.

दरवर्षी मे महिन्यातील पौर्णिमेला पाणवठ्यावरील गणना करण्यात येते. यंदा ७ मे रोजी ही पौर्णिमा आहे. राज्यभरातील जंगलांमध्ये वन्यजीवप्रेमी रात्रभर मचाणावर बसून पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांच्या नोंदी घेत असतात. पूर्वी प्राण्यांची अधिकृत गणना करण्यासाठी याच पद्धतीचा उपयोग होत असे. गेल्या काही वर्षांमध्ये कॅमेरा ट्रॅप आणि ट्रान्झिट लाइन पद्धतीचा उपयोग प्राण्यांच्या अधिकृत गणनेसाठी केला जातो. त्यामुळे पाणवठ्यावरील गणनेचे महत्त्व वनविभागाच्या लेखी कमी झाले आहे. मात्र, वन्यजीवप्रेमींना वनजीवन आणि गणना यांचा अनुभव घेता यावा याकरिता हा उपक्रम अद्यापही दरवर्षी राबविण्यात येतो. या उपक्रमांना आता निसर्गानुभव असे नावही देण्यात आले आहे.

दरवर्षी, विदर्भातील जंगलांमध्ये होणाऱ्या गणनेला अनेक ठिकाणांवरून लोक येत असतात. मात्र, यंदा करोना लॉकडाउन सुरू असल्याने या अनेक वर्षांच्या परंपरेला खीळ बसणार आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गणना केली जाऊ नये, असे आदेश वन मुख्यालयाने दिले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असे कार्यक्रम घेतले जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्राणिगणनेत सहभागी होण्यासाठी अनेक दूरवरच्या ठिकांणांवरून लोक जंगलात येतात. मात्र, सध्या असे अनेक लोकांनी एकत्र येणे धोक्याचे असल्याने यंदा सर्वच जंगलांमधील प्राणिगणनेचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याचे राज्याच्या वन्यजीव विभागाने कळविले आहे.

वैशाख पौर्णिमेला असतॊ स्वच्छ चंद्रप्रकाश

दरवर्षी मे महिन्यातील पौर्णिमेला ही गणना केली जाते. वैशाख किंवा मे महिन्यात वातावरण पूर्णपणे कोरडे असते आणि सर्वाधिक चंद्रप्रकाश असतो. रात्रीच्या वेळी जंगलात प्राणी दिसण्यासाठी ही पौर्णिमा सर्वात उपयुक्त असते. मे महिन्यात निवडक पाणवठ्यांना आणि ते ही कमी पाणी असल्याने अशा ठिकाणी सर्व प्रकारचे प्राणी मोठ्या संख्येने दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे, मचाण गणनेसाठी या रात्रीची निवड करण्यात येते.

पैसे देऊन आणायचे मजूर

‘गेल्या काही वर्षांत मचाणांवर उपलब्ध जागांपेक्षा जास्त संख्येने इच्छुकांचे अर्ज वन विभागाकडे येतात. त्यातून निवड करून मचाणांवर वन्यजीवप्रेमींची नियुक्ती केली जाते. मात्र, २० ते २२ वर्षापूर्वीपर्यंत मचाण गणनेकरिता इतकी गर्दी राहात नसे. नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये आम्हाला मचाणावर बसविण्यासाठी पुरेशी माणसे मिळत नसत. मोजके इच्छुक वन्यजीवप्रेमी आणि वन विभागाचे कर्मचारी यांची नेमणूक झाल्यावरही कित्येक मचाणांवरील जागा रिकाम्या राहात असत. मग आम्हाला जंगलाभोवतालच्या किंवा जंगलातील गावांमधील ग्रामस्थांची मदत घ्यावी लागे. काही जणांची मुले शहरात शिकायला असत. ती मे महिन्यात घरी परत येत. त्यांनाही गणनेच्या कामात समाविष्ट करीत असू. या सगळ्यांना गणनेच्या कामासाठी वेगळे पैसे द्यावे लागत असत. २००० नंतर प्राणिगणनेला येणाऱ्यांची संख्या जास्त वाढली. पूर्वी ही जंगलांच्या संरक्षित भागातच होत असे. त्यानंतर, मग बाहेरही केली जाऊ लागली’, असे वन्यजीव क्षेत्रातील कामांचा दीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ वनाधिकारी गिरीश वशिष्ठ यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pakistan pti leaders fight: Video सिंध विधानसभेत राडा; इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते आपसात भिडले! – pakistan leaders of imran khans party tehreek e...

सिंध: संसद, विधानसभेत विरोधी पक्षातील सदस्य हमरीतुमरीवर येतात. मात्र, पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या विधानसभेत इम्रान खान यांच्या 'तहरीक-ए-इन्साफ' या पक्षातील तीन नेत्यांमध्ये राडा झाला....

Ahmednagar: ‘शासनाचा माणूस’ आहे सांगून ‘तो’ रुग्णांना घालायचा गंडा, पण… – ahmednagar man duped patients pretext of health policy

म. टा. प्रतिनिधी, नगर: गरीब रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली. मात्र, त्याच...

संमेलनाबाबत संभ्रम

म. टा. प्रतिनिधी, एकीकडे चाळीस समित्यांच्या रोजच्या उठाबशांनी सर्वत्र चर्चेत आलेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा वाढत्या करोनापुढे निभाव लागणार का, असा सवाल आता साहित्य...

Recent Comments