Home शहरं नागपूर Nagpur News : हॉटस्पॉट झोनमधून आलेल्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा - crime against a...

Nagpur News : हॉटस्पॉट झोनमधून आलेल्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा – crime against a couple from a hotspot zone


म.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

मुंबईसारख्या हॉटस्पॉट शहरातून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या दोन व्यक्तींवर भारतीय दंड संहितेचे १८६०चे कलम १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे ५१ (बी), साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ अंतर्गत रामनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ जून रोजी मुंबईवरून एकाच कुटुंबातील पती-पत्नी असे दोन व्यक्ती चंद्रपूरमध्ये दाखल झाले. परंतु, शहरामध्ये प्रवेश करताना आरोग्य तपासणी व नोंदणी करणे गरजेचे होते. किंवा याबद्दलची माहिती महानगरपालिकेला देणे गरजेचे होते. परंतु, या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारची तपासणी अथवा माहिती जिल्हा प्रशासनाला दिली नाही. यासंदर्भात २० जून रोजी जिल्हा करोना नियंत्रण कक्षाला माहिती प्राप्त झाली. तसेच या दोन व्यक्तींनी २१ जून रोजी ‘फादर डे’च्या निमित्ताने राहत्या घरी कार्यक्रम आयोजित केला होता, अशी माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिली. या सर्व प्रकरणाची माहिती शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र-२, रामनगर मनपा चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत यांनी रामनगर पोलिसांना देताच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

salon in western railway stations: रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनही – western railway has decided to start air-conditioned salon on mumbai central station with six...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईघड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा...

Recent Comments