Home शहरं नागपूर Nagpur News : २८ दिवसांत जीवन जगण्याचा धडा शिकलो! - we learned...

Nagpur News : २८ दिवसांत जीवन जगण्याचा धडा शिकलो! – we learned the lesson of living life in 28 days!


करोना से डरोना

खेमेंद्र कटरे, गोंदिया

थायलंडहून परतल्यानंतर करोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू झाले. यावर लस नसल्याने कसे होणार, हा विचार मनात आला. रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असल्यास करोनावर मात करणे शक्य असल्याचे वाचले होते. हीच सकारात्मकता मनाशी घट्ट बांधली. आत्मविश्वास वाढला. जोडीला कुटुंबीयांचे बळ मिळाले. स्वत:ला होणारा त्रास दडवून त्यांनी साथ दिली. करोनावर मात करता आली. या २८ दिवसांनी जीवन जगण्याचा नवा धडा शकविल्याचे सांगत गोंदियाच्या युवकाने आपला करोनामुक्तीचा प्रवास उलगडला.

गोंदिया येथील हा युवक मित्रांसह थायलंडला पर्यटनासाठी गेला. रायपूर मार्गे १७ मार्चला गोंदियात परतला. त्याच्यासोबत असलेले राजनांदगावमधील दोन मित्र करोना पॉझिटिव्ह आढळले. आरोग्य विभागाने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून स्वॅब तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. अहवाल आला आणि करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. गोंदियाच्या शासकीय महाविद्यालयात त्याच्यावर १४ दिवस उपचार करण्यात आले. या दिवसांत काय केले हे सांगताना युवक म्हणतो, रुग्णालयात दररोज सकाळी मेडिटेशन, प्राणायाम करण्यास सुरुवात केली. दररोज गरम पाणी पिणे, दिवसभर सकारात्मक विचार करणे, आयसोलेशन कक्षात सामान्य व्यक्तीसारखा राहण्याचा प्रयत्न केले. रुग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यांचे मनोबल वाढविणारे विचार आणि सहकार्य मिळाले. फोनवरून कुटुंबासोबतच शेजारी व नातेवाइकांनी मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सकारात्मक ऊर्जा पेरत राहिले. आत्मविश्वासाने या परिस्थितीला सामोरे जात करोनावर मात केली. रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतरही डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले. अठ्ठावीस दिवसांनतर मोकळा श्वास घेत घराबाहेर पडलो.

करोनाला घाबरून न जाता त्याचा कणखरपणे सामना करणे आवश्यक आहे. नियमांचे काटेकोर पालन करून करोनाविरुद्धचा लढा आपण सहज जिंकू शकतो. प्रत्येकाने, स्वतःची, कुटुंबाची आणि आपल्या देशवासीयांची काळजी कशी घेतली पाहिजे, याची शिकवण करोनाशी लढताना मिळाल्याचे सांगण्यासही तो विसरत नाही.

सोशल मीडियाकडे दुर्लक्ष

रुग्णालयात असताना दररोज सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल व्हायच्या. त्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. आपण कसे चांगले आहोत, हे दाखविण्यासाठी सतत व्हिडीओ पाठवत होतो. रुग्णालयाने दिलेल्या प्रत्येक सूचनांचे काटेकोर पालन केले आणि करोनामुक्त झालो, असेही युवकाने सांगितले.

व्ही, मोबाईलची वेळ घालविण्यास मदत

करोनामुक्त झाल्याचा अहवाल आल्यानंतर रुग्णालयातून ९ मे रोजी रुग्णालयातून सुट्टी मिळाली. त्यानंतर १४ दिवस घरातच क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टारांनी दिला. त्यामुळे या कालावधीत दिवसभर एका स्वंतत्र खोलीत राहत होतो. दिवसभर टीव्ही पाहणे आणि मोबाइलवर गेम खेळण्यात वेळ घालवित होतो. याची मोठी मदत झाल्याचेही त्याने सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

President Ramnath Kovind: president speech on republic day : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे देशाला संबोधन… – president ramnath kovind speech on republic day live...

नवी दिल्लीः देश उद्या आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. करोना संकटाच्या स्थितीत आणि चीन, पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती देशाला...

Recent Comments