Home शहरं नागपूर Nagpur Suicide Case : कर्जाच्या तणावातून कुरिअर बॉयची आत्महत्या - कर्जाच्या तणावातून...

Nagpur Suicide Case : कर्जाच्या तणावातून कुरिअर बॉयची आत्महत्या – कर्जाच्या तणावातून कुरिअर बॉयची आत्महत्या


नागपूर: रामेश्वरीतील रमानगर भागात कुरिअर बॉयने पंख्याला बांधलेल्या साडीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रितेश अशोक रामटेके (वय ३२) असे मृताचे नाव आहे. घराच्या बांधकामासाठी त्याने कर्ज घेतले होते. या तणावातून रितेश याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

रितेश हा खासगी कुरिअर कंपनीत काम करीत होता. लॉकडाऊन असल्याने त्याची पत्नी शिल्पा मुलीसह माहेरी रामबाग येथे आहेत. शुक्रवारी रितेश हा पत्नी व मुलीला भेटायला गेला. सायंकाळी घरी परतला. आपल्या खोलीतील पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. रात्री ८ वाजताच्या सुमारास रितेश याचे वडील त्याच्या खोलीत गेले. रितेश पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती अजनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच अजनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राऊत यांच्यासह पथक तेथे पोहोचला. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

नगर: झाडाच्या फांदीत अडकून बिबट्याचा मृत्यू

करोना झाल्याच्या संशयातून तरुणाला मारहाण, गटारात पडून मृत्यू

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Parab: ‘सुपारी घेतल्याशिवाय मनसे हा पक्ष कामच करू शकत नाही’ – shivsena leader and maharashtra minister anil parab attacks on mns party over...

म. टा. प्रतिनिधी, मुंबई'मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू...

municipal corporation election in maharashtra: पालिकेत आवाज वार्डांचा ! – municipal corporation election in maharashtra and political party

जितेंद्र अष्टेकरस्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या निवडणुकीत प्रभागरचना करताना भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर केला. आता मात्र तसे काही होणार नाही, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री...

Recent Comments