Home शहरं नागपूर Nagpur weather forecast: विदर्भ तापला! अकोला ४४.९, नागपूरचा पारा ४४.२ अंशांवर -...

Nagpur weather forecast: विदर्भ तापला! अकोला ४४.९, नागपूरचा पारा ४४.२ अंशांवर – vidarbha akola and nagpur recorded maximum temperatures of 44.9°c and 44.2°c respectively


म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसामुळे शहरातील; तसेच विदर्भातील तापमान घसरले होते. यंदा उन्हाळ्याचा ‘फिल’च येत नसल्याची भावना विदर्भवासी व्यक्त करीत असतानाच, मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भात उन्हाळा खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची जाणीव झाली. रविवारी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४४.९ अंश, तर नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४४.२ अंश तापमानाची नोंद झाली.

यंदा एप्रिल महिन्यातही विदर्भाला वादळी पावसाने झोपडून काढले. त्यामुळे ज्या काळात विदर्भात पारा ४५ अशांच्या आसपास पोहोचलेला असतो; त्या काळात यंदा पारा ४० अंशांच्या आसपासच होता. सततचे ढगाळ वातावरण आणि परिणामतः होणारा पाऊस यामुळे अद्याप उन्हाची ‘भट्टी’ जमलीच नव्हती. परंतु शनिवारपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. रविवारी विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांपेक्षा अधिक होते. अकोल्यात सर्वाधिक ४४.९ तर त्या खालोखाल नागपुरात ४४.२ आणि ब्रह्मपुरी येथे ४४.१ अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर आणि अमरावती येथेही प्रत्येकी ४३.८ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भात बुलडाणा येथे सगळ्यात कमी ४१.४ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात किमान तापमानही २८.३ अंश इतके होते.

मंगळवारी पाऊस

मंगळवारपर्यंत अकोला, अमरावती व नागपूर येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र मंगळवारी भंडारा, गोंदिया आणि नागपूर येथे उष्णतेच्या लाटेसोबतच परत एकदा वादळी पावसाचीही शक्यता आहे. मंगळवारी शहरात ४५ अंशांच्या आसपास तापमान राहणार असले तरीसुद्धा वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुढील आठवड्यात शहरात पारा ४६ अंशांपर्यंतही जाऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांचा कडा पहारा

करोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस दलावर आहे. आज शहरात ४४ हून अधिक पारा असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी उन्हाच्या चटक्यांमध्येही बंदोबस्तासाठी रस्त्यांवर उभे होते.

नागपुरात दारू विक्रीला परवानगी नाही; पालिकेचा निर्णय

मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटली; तिघे जखमीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mamata Banerjee: ‘असा गृहमंत्री आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही’ – mamata banerjee alleges pm modi amit shah and bjp farmers protest coronavirus issue

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) जवळ येताच राजकारणाचा पारा चढत चालला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता...

virat kohli: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला… – indian captain virat kohli opens up on lack of clarity, confusion over...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या...

Sandeep Kulkarni Shares View On Technology And World – एखाद्या गोष्टीची जाणीव होत नाही, तोवर त्याची किंमत कळत नाही- संदीप कुलकर्णी

संदीप कुलकर्णीपहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, तेव्हा आपला जन्मही झाला नव्हता. त्या काळात जगातल्या काही देशांना या महायुद्धांची चांगलीच धग लागली. पण, करोनाच्या...

Recent Comments