Home महाराष्ट्र nalasopara violence: नालासोपाऱ्यात गुंडांनी नाचवल्या नंग्या तलवारी; वार करताच तरूण जागीच कोसळला...

nalasopara violence: नालासोपाऱ्यात गुंडांनी नाचवल्या नंग्या तलवारी; वार करताच तरूण जागीच कोसळला – thane violent clashes erupted in nalasopara area


नालासोपारा: मित्रासोबतचं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर गुंडांनी तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा येथील प्रगती नगर परिसरात घडली. त्यानंतर गुंडांनी हातात नंग्या तलवारी नाचवून भररस्त्यात अक्षरशः धुडगूस घातला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात २९ जूनला ही धक्कादायक घटना घडली. मित्रासोबत झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच गुंडांच्या टोळीने तलवारीने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही भररस्त्यात काही तरुण हातात तलवारी आणि चॉपर घेतलेले दिसत आहेत. दोन ते तीन तरुणांवर वार करण्यात आले. तसेच मारहाण करण्यात आली. एका तरुणाने साथीदाराच्या हातातून तलवार आणि चॉपर हिसकावून घेतले आणि त्यानंतर तो तरुणावर धावून गेला. त्याने तरुणावर तलवारीने वार केले. त्यानंतर तो तरूण जागीच जमिनीवर कोसळला. इतकंच नाही तर त्याचे काही साथीदार जमिनीवर जखमी अवस्थेत कोसळलेल्या तरुणाला लाथाबुक्क्यांनीही मारताना दिसत आहेत. भररस्त्यात सुरू असलेली गुंडागर्दी पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India Stands with France: ‘दहशतवादाविरोधातील लढाईत भारत फ्रान्ससोबत, हल्ल्यांचा निषेध’ – india stands with france in the fight against terrorism

नवी दिल्लीः फ्रान्समधील नाइस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं...

L&T Construction Awarded Mega Contract : बुलेट ट्रेन प्रकल्प सुस्साट; ‘लार्सन अँड टुब्रो’ला मिळाले कंत्राट – l&t construction awarded mega contract to build india’s...

मुंबई : 'एल अँड टी'च्या बांधकाम विभागाने भारतातील आपल्या हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायासाठी नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एनएचआरसीएल) मोठे कंत्राट मिळवले...

Recent Comments