Home विदेश nasa release sun video: १० वर्षात असा बदलला सूर्य; नासाचा हा व्हिडिओ...

nasa release sun video: १० वर्षात असा बदलला सूर्य; नासाचा हा व्हिडिओ पाहिला का? – nasa releases 10-year time-lapse video of the sun


वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सूर्यामध्ये नेमके काय बदल होत आहेत, यावर नासाच्या शास्त्रज्ञांचा अभ्यास सुरू आहे. नासाच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीने सूर्याचे चित्रीकरण करण्यात आले. या ऑब्जर्वेटरीने काही महत्त्वाची निरीक्षण नोंदवली आहेत. या ऑब्जर्वेटरीने चित्रित केलेला व्हिडिओ नासाने टाइम लॅप्स ट्विट केला आहे. सध्या या व्हिडिओची चर्चा सुरू आहे.

सूर्यामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम पृथ्वी आणि सौरमंडळावर होत असतो. त्याच अनुषंगाने अभ्यास करण्यासाठी नासाने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीद्वारे तब्बल १० वर्ष निरीक्षण करून अभ्यास केला. त्याबरोबरीने सूर्याची ४५ कोटी हाय-रिझोल्यूशन छायाचित्रे घेतली. तर, तब्बल दोन कोटी गीगाबाईट डेटा जमा केला. नासाने याचा टाइम लॅप्स व्हिडिओ जारी केला. यामध्ये मागील ११ वर्षापासून सौर चक्राच्या गतीमधील बदल टिपण्यात आले असल्याचे नासाने म्हटले आहे.

या व्हिडिओमुळे नासाच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. सूर्याच्या गतीमध्ये होत असलेल्या बदलाचा आणि सौरमंडळावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करता येणार आहे. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र एका चक्रातून जाते. त्यास एक सौर चक्र म्हणतात. दर ११ वर्षांनी सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रात बदल होतो. नासाने युट्यूबवर जारी केलेला व्हिडिओ हा ६० मिनिटांचा आहे. या तासाभराच्या व्हिडिओत सूर्याचा ११ वर्षातील बदल दाखवण्यात आला आहे. यामध्ये एका सेंकदाला एक दिवस दाखवण्यात आला आहे.

अंतराळात घडणाऱ्या घडामोडींबद्दल अनेकांना उत्सुकता असते. खगोलप्रेमींसाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून यामध्ये सूर्यावर १० वर्षात झालेले बदल टिपण्यात आले आहे. हा व्हिडिओ दोन जून २०१० ते एक जून २०२० या कालावधीतील आहे.

आणखी वाचा:
द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट; कंपन्यांचा फेसबुकवर बहिष्कार
करोनाची लस येण्याआधीच बिल गेट्स यांचं चिंता वाढवणारं वक्तव्यSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments