Home शहरं नाशिक Nashik News : आता विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनही ऑनलाईन - pandharpur's sri vitthal-rukmini temple...

Nashik News : आता विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनही ऑनलाईन – pandharpur’s sri vitthal-rukmini temple starts online live darshan


म. टा. प्रतिनिधी, नाशिक: करोनाच्या आपत्तीनंतर सर्वत्र ऑनलाइन संवादावर भर देण्यात येत आहे. या ऑनलाइन विश्वापासून यंदा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे पंढरपूरदेखील दूर राहीलेले नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अनेक भाविकांना वारीला मुकावे लागले असले तरीही पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी समितीने भाविकांना ऑनलाइन दर्शनासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

सर्व मंदिरांप्रमाणे यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरदेखील दर्शनासाठी बंद आहे. १ जुलै रोजी असणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांना पंढरीनाथाचे दर्शन घडावे, मंदिर समितीने वेबसाईटद्वारे दर्शन व्यवस्था केली आहे. भाविकांना http://www.vithalrukminimandir.org या वेबसाईटवर थेट ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. याशिवाय भाविकांना गुगल प्ले स्टोअरवरदेखील श्री विठ्ठल रूक्मिणी लाईव्ह दर्शन हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी वाहनाद्वारे यंदा पंढरपुरास नेण्यात येऊन परंपरा अबाधित राखली जाणार.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jagannath kunte: jagannath kunte : नर्मदे SS हर हर… लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन – narmade har har writer jagannath kunte passed away

म. टा. प्रतिनिधी, पुणे: आपल्या लिखाणातून नर्मदा परिक्रमा लोकप्रिय करणारे आणि 'नर्मदे हर हर' या पुस्तकासाठी ( narmade har har ) अफाट लोकप्रियता...

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments