Home शहरं नाशिक Nashik News : ‘आरोग्य’तर्फे परीक्षांचा प्लॅन - exam plan by 'arogya'

Nashik News : ‘आरोग्य’तर्फे परीक्षांचा प्लॅन – exam plan by ‘arogya’


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर इतर अभ्यासक्रमांप्रमाणे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षांचे पुनर्नियोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमार्फत करण्यात आले असून, त्याचा आराखडा कुलपती अर्थात राज्यपालांकडे नुकताच मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. ही मंजुरी मिळताच विद्यापीठामार्फत परीक्षांच्या तारखांसह नियोजन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

दरवर्षी आरोग्य विद्यापीठामार्फत १५ मे ते १५ जूनदरम्यान पदवी तसेच पदव्युत्तर विविध अभ्यासक्रांच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. यावर्षीही हे नियोजन करण्यात आले. परंतु, करोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अन्य अभ्यासक्रमांप्रमाणेच वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या. सध्या विद्यापीठाकडून मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि नर्सिंग या पाचही कौन्सिलकडून परीक्षेच्या नियोजनाबाबत सूचनापत्रे मागविण्यात आली आहेत. त्यापैकी मेडिकल आणि नर्सिंग कौन्सिलकडून ही सूचनापत्रे आली असून, अन्य तीन कौन्सिलमार्फत सूचनापत्रे मिळणे बाकी आहे. त्यानुसार विद्यापीठामार्फत परीक्षांचा प्लॅन तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

विद्यापीठामार्फत परीक्षेच्या तारखा जाहीर केल्यानंतरही ऐनवेळी कोणती परिस्थिती उद्भवेल हे सद्यस्थितीत सांगणे अवघड आहे. त्यामुळे यासाठी विद्यापीठाने काही पर्यायही तयार ठेवल्याची माहिती कुलगुरू म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठाची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, सर्व कौन्सिल्सच्या सूचना, कुलपतींची मंजुरी, राज्य सरकारने जाहीर केलेले नियम व अटी या सर्व बाबींचा विचार करून त्यानंतरच योग्य मार्ग निवडावा लागणार आहे. परीक्षांसोबत विद्यार्थ्यांची सुरक्षाही महत्त्वाची असल्याने, त्याचाही प्राधान्याने विचार केला जाणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली.

वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी संवाद

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर, संबंधित विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा कधी होणार याबाबत मोठा संभ्रम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्र-कुलपती अमित देशमुख यांनी नुकताच कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी परीक्षेबाबतचा निर्णय घेऊन, तो लवकरात लवकर जाहीर करण्याची सूचनाही देशमुख यांनी विद्यापीठाला केली आहे.

…………

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातही अशीच परिस्थिती आहे. सध्या आमचे बरेच विद्यार्थी ‘कोविड-१९’च्या आपत्तीमध्ये विविध हॉस्पिटल्समध्ये सेवा देत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किमान एक महिना वेळ देणे आवश्यक आहे. त्यानंतरच परीक्षा होतील.

-डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू,

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Deepesh Sawant’s Allegations Are False, NCB Tells To Bombay High Court – सुशांतसिंह आत्महत्या: दीपेश सावंतचे ‘ते’ आरोप खोटे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मदतनीस दीपेश सावंत याने एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलावले...

Recent Comments