Home शहरं नाशिक Nashik News : उपकर आकारणीला व्यापाऱ्यांचा विरोध - traders oppose cess levy

Nashik News : उपकर आकारणीला व्यापाऱ्यांचा विरोध – traders oppose cess levy


घाऊक किराणा दुकाने बंदचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे एक टक्का बाजार उपकर (सेस) वसुली होत असून, विनाकारण दहापट दंड आकारला जात असल्याचा दावा करीत नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेने सोमवारपासून (दि. १८) सर्व घाऊक किराणा दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंवर चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करणे गैर असून, याबाबत उच्च न्यायायलात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारादेखील व्यापाऱ्यांनी दिला आहे.

करोनाच्या संकटात जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक सुरू असून, किराणा दुकाने लॉकडाउन लागू झाल्यापासून सेवा देत आहेत. मात्र, बाजार समितीतर्फे रस्त्यात आणि समितीच्या आवारात नसलेल्या गोदामाजवळ अडवणूक होत आहे. यावेळी सेससह दहापट दंडाची आकारणी होत असून, दीड महिन्यात ट्रान्स्पोर्टर आणि व्यापाऱ्यांकडून हजारो रुपये वसूल करण्यात आल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडेही संघटनेने तक्रार केली आहे. यानंतर दहाऐवजी पाचपट दंड वसूल करण्यात आला. यामुळे नेमकी दाद कोणाकडे मागावी, हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे माल वाहतुकीसाठी कामगार तयार होत नसून, जीवनावश्यक वस्तू खोळंबत आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कल्पना दिली आहे. आज, रविवार असल्याने बाजारपेठ बंद राहणार असून, सोमवारपासून बेमुदत दुकाने बंद राहतील, अशी माहिती सचिव राकेश भंडारी यांनी दिली.

Bआज निर्णयाची शक्यता

Bतक्रारीबाबत उपजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याशी रविवारी संपर्क साधण्यात येणार आहे. यावेळी दंड वसुली बंद करण्याबाबत ठोस निर्णय झाल्यास बेमुदत बंदचा इशारा मागे घेण्यात येईल. मात्र, बैठकीत निर्णय न झाल्यास घाऊक दुकाने खुली होणार नसल्याचे अध्यक्ष प्रफ्फुल संचेती यांनी सांगितले. यामुळे बंदबाबत आज सायंकाळी उशिरापर्यंत निर्णयाची शक्यता आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

निवडणुकीचे मानधन न मिळाल्यानं शिक्षक संतापले – teachers from niphad did not get paymet of work in gram panchayat election

म. टा. वृत्तसेवा, निफाडतालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, गावोगावचे कारभारी निवडले गेले, गुलाल उधळला गेला. मात्र या निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजासाठी झटणाऱ्या...

Recent Comments