Home शहरं नाशिक Nashik News : उपसंचालकपदाचा पोरखेळ - deputy director's play

Nashik News : उपसंचालकपदाचा पोरखेळ – deputy director’s play


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा विभाग असणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपसंचालकपदाचा दोन महिन्यांपासून पोरखेळ सुरू असल्याचे चित्र आहे. तत्कालीन प्रभारी उपसंचालक नितीन बच्छाव यांची निलंबनामुळे गच्छंती झाल्यानंतर मार्चपासून दोन वेळा हा पदभार बदलण्यात आला आहे. तसेच येत्या दोन-तीन दिवसात तिसऱ्यांदा हा पदभार बदलणार असल्याचे निश्चित झाले आहे.

शिक्षकांच्या मान्यता, वेतन, शालार्थ आयडी यासह अनेक समस्यांना जिल्ह्यातील शिक्षक तसेच शिक्षकेतरांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे शिक्षण उपसंचालक कार्यालय मात्र प्रभारी नियुक्त्यांमुळे सुस्त आहे. माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार होता. त्यांच्या निलंबनानंतर ३० मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत नितीन उपासनी यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. १६ एप्रिलनंतर त्यांची नियुक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात करण्यात आली. त्यानंतर ३० एप्रिलपासून उपसंचालक कार्यालयातील अधिकारी पुष्पावती पाटील यांच्याकडे हा पदभार देण्यात आला. त्यांच्या कामास एक महिना पूर्ण होतो न होतो तोच पुन्हा त्यांच्याकडील पदभार काढून शिक्षण उपसंचालकपदी उपासनी यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. दोन महिन्यात तिसऱ्यांदा हा पदभार बदलणार असून, किमान आता तरी या पदाचा भार प्रभारींवर न देता स्वतंत्र अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक आहे. येत्या चार दिवसात हे बदल घडणार असल्याची माहिती या विभागतील सूत्रांनी दिली.

बोगस शालार्थ आयडीचे आव्हान

नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यात सहाशे बोगस शालार्थ आयडी देण्यात आल्याचे समजते. याच आरोपांमध्ये दोन मोठ्या शिक्षण अधिकाऱ्यांचे निलंबन झाले. त्यामुळे या पदावर येणाऱ्या अधिकाऱ्यावर बोगस शालार्थ आयडी शोधून ते रद्द करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. यात अनेक राजकीय हितसंबंध गुंतल्याचीही चर्चा आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments