पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी २ जानेवारी २०२० रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सभापतिपदासाठी भाजपकडून संजय भास्करराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजय भाऊसाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पंचायत समितीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी ७ सदस्य आहेत. प्रत्यक्ष सभापतिपदाच्या निवडीप्रसंगी राष्ट्रवादीचे अजय पाटील यांना ८ तर भाजपचे संजय पाटील यांना ७ मते पडली. उपसभापतिपदासाठी भाजपकडून मेहूणबारे गणाच्या सुनंदा साळुंखे व भाजपचे बंडखोर सुनील पाटील यांच्यात लढत झाली. त्यात सुनील पाटील यांना ८ तर सुनंदा साळुंखे यांना ६ मते मिळाली होती.
पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाने मिटिंगचा अजेंडा काढला होता. सभापती, उपसभापती निवडीच्या वेळी व्हीप देखील बजावला होता. त्यांनी व्हीपचे उल्लंघन केले असा दावा करीत भाजपाचे पंचायत समितीचे गटनेते व सभापती पदाचे पराभूत उमेदवार संजय भास्कर पाटील यांनी या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती.