Home शहरं नाशिक Nashik News : एकाचा मृत्यू, १६ बाधितांची भर - one killed, 16...

Nashik News : एकाचा मृत्यू, १६ बाधितांची भर – one killed, 16 injured


शहरातील एकूण रुग्ण २५०; ग्रामीणचीही द्विशतकाकडे वाटचाल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात मंगळवारी (दि. २) दिवसभरात १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोनाबाधितांचा आकडा २५० झाला आहे, तर एका अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११ झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १२८९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ७५ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागातही आठ रुग्ण बाधित आढळून आल्याने रुग्णसंख्या १९७ म्हणजेच दोनशेच्या जवळपास पोहोचली आहे.

गत आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्यात करोना संसर्ग वाढीचा वेग काहीसा मंदावला आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढ‌ळून आले. यापैकी आठ रुग्ण नाशिक शहरातील असून, त्यांच्यापैकी पाच रुग्ण सोमवारी रात्री उशिरा मिळून आले होते. त्यांची नोंद सिव्हिल हॉस्पिटल प्राशसनाने मंगळवारच्या अहवालात केली. मंगळवारी दिवसभरात दुपारपर्यंत तीन आणि रात्री नऊच्या सुमारास १३ या अशा एकूण १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सिडकोतील शिवशक्ती चौक येथील ३७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. किशोर सूर्यवंशी मार्ग, समर्थनगर येथील ६६ वर्षीय वृद्धही बाधित असून, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती मार्केटयार्डात कामाला आहे. गंगापूर रोडवरील शर्मीला अपार्टमेंट येथील ४९ वर्षीय महिलेलाही बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेवर बिटको हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. याशिवाय, रात्री नऊच्या सुमारास १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. सातपूर येथील राजवाडा, नाशिकरोड येथील इच्छामणीनगर, गोसावीवाडी, पाथर्डी फाटा परिसरातील दोंदे मळा, पेठरोड येथे तीन, पंचवटीतील एमएचबी कॉलनी दोन, दिंडोरी रोड येथील कलानगर, टाकळी येथील समतानगर, सिडकोतील वीर सावरकरनगर येथे बाधित रुग्ण मिळून आले आहेत. ग्रामीणमध्ये मालेगाव, सिन्नर आणि नांदगावात प्रत्येकी दोन, तर इगतपुरीत तीन रुग्ण आढळून आले आहेत.

अमृतधाम येथील बाधिताचा मृत्यू

विडी कामगारनगर, अमृतधाम येथील ५६ वर्षीय बाधित रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती ३१ मे रोजी रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. या रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना पूर्वीपासून मधुमेह व रक्तदाबाचा विकार होता. मंगळवारी (दि. २ जून) पहाटे त्यांचे निधन झाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BJP government in Maharashtra: त्यांचे ‘हे’ कौशल्य आज कळाले; शरद पवारांचा दानवेंना चिमटा – raosaheb danve was never known as a ‘jyotishi’ but now...

मुंबई: पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी’ – Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay...

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका सुरात भाजपला घेरलं असताना काँग्रेसचे माजी खासदार...

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

Recent Comments